You are currently viewing कणकवलीत वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच.!

कणकवलीत वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच.!

दोन दिवसांत ७८ केसेस ; ६०,५०० रुपयांचा दंड वसूल

कणकवली

कणकवलीत बेशिस्तपणे गाड्या चालविणाऱ्या व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर तसेच ट्रिपल सीट, वाहनाला आरसा नाही, नंबर प्लेट नाहीत, मोबाईल वर संभाषण करत वाहन चालवल्या प्रकरणी १५ मे रोजी ५२ व १६ मी २६ रोजी अशा मिळून एकूण ७८ केसेस करून तब्बल ६०,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

एवढं करूनही बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यांवर कोणताही फरक पडत नसल्याचे अद्यापही दिसत आहे. त्यामुळे ही कारवाई सुरूच राहणार असून कणकवली शहरात होणारी वाहतूक कोंडी आता हळूहळू सुरळीत होणार आहे.

सदरची कारवाई कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी गुरुवारी व शुक्रवारी केली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून कणकवली शहरातील वाहतूक ही नेहेमी पेक्षा काहीप्रमाणात सुरळीत होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा