You are currently viewing सांडपाणी, घनकचरा, प्लास्टिक व्यवस्थापन प्रकलपासाठी जागा द्या

सांडपाणी, घनकचरा, प्लास्टिक व्यवस्थापन प्रकलपासाठी जागा द्या

माजगाव सरपंच डॉ सावंत यांनी शिक्षणमंतत्री केसरकर यांच्याकडे केली मागणी

सावंतवाडी

सांडपाणी, घनकचरा व प्लास्टीकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पासाठी जमिन मिळणेबाबतची मागणी माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.

ग्रामपंचायत माजगाव ग्रामपंचायतीची आज रोजींची अंदाजे लोकसंख्या १०१६० पेक्षा अधिक असून माजगाव गावात नागरीकरण व शहरीकरण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे माजगाव गावात सांडपाणी घनकचरा व प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने सांडपाणी व बनकचरा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केलेला असून या प्रस्तावास संदर्भच्या आदेशाने तांत्रिक मान्यता मिळालेली आहे परंतू या प्रकल्पासाठी लोकवस्तीपासून दूर अंतरावर आवश्यक जमिन ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. परंतू ग्रामपंचायत माजगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सर्व्हे क्र. १०३ क्षेत्र ३.९६० महाराष्ट्र सरकार यांचे नावे जमिन आहे तरी या क्षेत्रापैकी ०.१०.० इतके क्षेत्र ग्रामपंचायत माजगावच्या सांडपाणी घनकचरा व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पासाठी ग्रामपंचायत माजगाव ग्रामपंचायतीला मिळण्यासाठी संदर्भ क्र. २ व ३ ने प्रस्ताव दिलेला आहे. तरी ग्रामपंचायतीला १० गुंठे जमिन मिळण्यासाठी आदेश देण्याची मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा