You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द कराव्यात –  गोपाळ गवस 

दोडामार्ग तालुक्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द कराव्यात –  गोपाळ गवस 

दोडामार्ग

दोडामार्ग तालुका विकासाच्या वाटेवर असताना तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या चिंताजनक असूनह्या थांबाव्यात यासाठी शिवसेना तालुका संघटक गोपाळ गवस सरसावले असून तालुक्यातील डॉक्टर्स व पोलीस अधिकारी यांच्या बदल्या त्वरित रद्द काराव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा देत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अगोदर शिक्षा म्हणून दोडामार्ग तालुक्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या मात्र आता ती परिस्थिती बदलली आहे, तालुका हा विकासाच्या दिशेने झेपावत आहे, त्यामुळे याठिकाणी अधिकारीही आपले काम कर्तव्यनिष्ठ पणे करतात, मात्र शासन कोणत्या निकषांनुसार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करते हेच कळत नाही, साटेली भेडशी आरोग्य केंद्रात कर्तव्यनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांची बदली असेल, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातचे डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची प्रास्तावित बदली असेल आणि आता कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणारे दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची बदली असेल हे सर्वच मनाला न पटणारे आहे.

डॉक्टर चांगली सेंवा देतात, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी तर तालुक्यात दाखल होताच अनेक वाखाणण्या जोगे तपास केले, हल्लीच घोटगेवाडी येथे झालेल्या खुनाचा छडा अगदी आठ तासात लावला,असे अनेक तपास तसेच तालुक्यात शांतताव सुव्यस्था राखण्याचे काम त्यांनी केले. पूना मेजर बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी अनुभवी काम केलेले कर्तव्यदक्ष अधिकारी दोडामार्ग तालुक्याला लाभले कमी कालावधीत लोकांचा विश्वास त्यांनी जिंकला मात्र त्यांना बक्षीस स्वरूपात प्रशासकीय बदली मिळाली, तालुक्या ची घडी आता कुठे सुरळीत बसतेय तोवर त्यांचीही बदली झाल्याने दोडामार्ग तालुक्याच्या विकासावर याचा परिणाम होईल मात्र अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची दोडामार्गला गरज असल्याने ही बदली त्वरित रद्द करावी अन्यथा दोडामार्ग तालुका वासीयांना घेऊन आवाज उठवू व जनआंदोलन उभारू असा इशारा गोपाळ गवस यांनी दिला आहे.

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा