ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकिसाठी ९७.९७ टक्के चुरशीचे मतदान झाले आहे. १५ संचालक पदासाठी ६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून शुक्रवारी सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील संस्थेच्या पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव यांनी दिली.