You are currently viewing युवतीसेना समन्वयक शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन*

युवतीसेना समन्वयक शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन*

*युवतीसेना समन्वयक शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन*

*हजारो महिला स्पर्धकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीत स्पर्धा संपन्न*

*आ.वैभव नाईक यांनी शिल्पा व यतीन खोत यांच्या सामाजिक कार्याचा केला गौरव*

कुडाळ मालवण विधानसभा युवतीसेना समन्वयक सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या नारळ लढविणे या भव्यदिव्य स्पर्धेला हजारो महिला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. हि स्पर्धा मालवण येथील नवीन बंदर जेटीवर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वराज्य ढोल पथकाच्या सुरेल ढोलवादनाला कोंबडा आणि हनुमान यांच्या वेशभूषेची लाभलेली साथ त्यामुळे ही स्पर्धा रंगतदार झाली.यावेळी आ. वैभव नाईक यांनी सौ शिल्पा खोत तसेच यतीन खोत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या

या स्पर्धेच्या मानकरी नंदिनी परब ठरल्या. मानाचा सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ यांनी मढवलेली दिमाखदार ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या महाविजेत्या नंदिनी परब यांना सुपूर्द करण्यात आली.स्पर्धेत कस्तुरी राऊळ या उपविजेत्या ठरल्या. त्यांना सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ यांनी मढवलेली ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांक प्राप्त भार्वी शिर्सेकर व चतुर्थ क्रमांक प्राप्त रोसेस लुद्रीक यांना सोन्याची नथ देऊन मान्यवर व आयोजक टीमच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यासह स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत पोहचलेल्या दहा स्पर्धकांना चांदीची नाणी देत सन्मानित करण्यात आले. तसेच आयसीआयसीआय प्रुडेनशीयल व शिल्पा खोत मित्रमंडळ वतीने लकी ड्रॉ स्वरूपात वीस जणांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते संदेश पारकर,माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,माजी नगराध्यक्ष महेश कांदाळगावकर,माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, संमेश परब, उद्योजक राजन आंगणे, उमेश नेरुरकर, अमेय पै,जॉन रोना, परशुराम पाटकर, देवदत्त हडकर, डॉ. शिल्पा झाटये, एपीआय सुप्रिया बंगडे, तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, वैशाली शंकरदास, स्मृती कांदळकर, गीतांजली आचरेकर, अनुष्का चव्हाण, सिया धुरी, श्रद्धा वेंगुर्लेकर, मेघना कांबळी, निकिता बागवे, सुहास वालावलकर, बंड्या सरमळकर, सचिन ओटवणेकर, प्रतिभा चव्हाण, नंदा सारंग, रूपा कुडाळकर, काँग्रेस पदाधिकारी बाळू अंधारी, पल्लवी तरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, वेंगुर्ला येथील सरपंच सुमेधा तेंडुलकर, अभय कदम, उमेश चव्हाण, प्रवीण रेवणकर, बाबा मडये, करण खडपे, यशवंत गावकर, हेमंत मोंडकर, अंकिता मयेकर, मनस्वी कदम, वझे काकी, चारुशीला आढाव, शांती तोंडवळकर, निनाक्षी शिंदे, दिव्या परब, अनुष्का चव्हाण, गीता आचरेकर, भारती आडकर, अनंत पाटकर, दिलीप पवार, अमन यासह मालवणी स्वरांचा बादशाहा निवेदक बादल चौधरी, अक्षय सातार्डेकर यासह अनेक मान्यवर, सहकारी मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला व तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग घेत नारळ लढविण्याचा आनंद लुटला. स्पर्धां पाहण्यासाठी मालवणवासीयांनी एकच गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 15 =