श्रद्धा इन्स्टिट्युटची वैभवी पवार एमएचटी-सीईटी परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम
इचलकरंजी : प्रतिनिधी
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या एमएचटी-सीईटी परिक्षेत येथील श्रद्धा इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश संपादन केले. यामध्ये वैभवी पवार हिने पीसीएम विभागात पैकीच्या पैकी गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर 99 टक्के गुण मिळवणार्यांमध्ये इन्स्टिट्युटच्या 53 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकुणच श्रद्धा इन्स्टिट्युटने एमएचटी-सीईटी बरोबरच जेईई, मेन अॅडव्हान्स्ड, नीट मेडिकल या सर्वच परिक्षांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवल्याचे संस्थेचे अध्यक्ष ए.आर. तांबे यांनी सांगितले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच ध्यास घेऊन 39 वर्षांपूर्वी श्रद्धा इन्स्टिट्युटची स्थापना केली असून आता या संस्थेत संपूर्ण महाराष्ट्रातील 6 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगत ए.आर. तांबे यांनी संस्था स्थापनेपासूनचा एमएचटी-सीईटी परिक्षेतील यावर्षीचा निकाल सर्वाधिक आहे. यामध्ये वैभवी पवार ही पैकीच्या पैकी गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम आली असून ओम खोत, सुजल बनकर या दोघांनी 99.97, गायत्री भाट, दिग्विजय कुंभार, हर्षवर्धन पाटील या विद्यार्थ्यांनी 99.95 टक्के, सोहम बोळाज 99.93, कशिष जैन, सारंग कुलकर्णी 99.92 यांच्यासह 99 टक्के गुण मिळवणारे 53 तर 95 टक्केपर्यंत गुण मिळवणार्यांमध्ये 250 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळवणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे. एमएचटी-सीईटी बरोबरच जेईई, मेन अॅडव्हान्स्ड, नीट मेडिकल या सर्वच परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम आहे. संस्थेचे अचूक नियोजन, योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे कष्ट आणि पालकांच्या विश्वास ही चतु:सुत्री संस्थेच्या यशाचे गमक आहे. मिळालेले हे यश म्हणजे गगनाला गवसणी घातल्यासारखेच आहे. संस्थेबद्दल आम्हाला काही बोलावे लागत नाही, संस्थेचे यशच सर्वकाही बोलून जात असल्याचे तांबे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे समन्वयक एम.एस. पाटील, सुप्रिया कौंदाडे, संगिता पवार, अभिषेक तांबे, अक्षय तांबे, सृष्टी तांबे आदी उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*🧑🏻🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻🎓*
📣 *B. C. A. DEGREE*
*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑💻🧑💻
*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*
*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*
*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*
*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-