You are currently viewing जो पर्यंत जिल्हावासीयांना टोल मुक्ती मिळत नाही तो पर्यंत टोल वसूली बंद – नितेश राणे

जो पर्यंत जिल्हावासीयांना टोल मुक्ती मिळत नाही तो पर्यंत टोल वसूली बंद – नितेश राणे

कणकवली

जो पर्यंत जिल्हावासीयांना टोल मुक्ती होत नाही तसेच आवश्यक त्या सुविंधासोबत बाधीत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यंत ओसरगाव टोल नाक्यावर टोल सुरू होवू देणार नाही, अशी भूमिका भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी मांडली. दरम्यान आज टोल सुरू झाल्यानंतर आम्ही संबधित टोलच्या अधिकार्‍यांसोबत केंद्रीय स्तरावरील पदाधिकार्‍यांची चर्चा केली तसेच आमच्या मागण्या पुर्ण झाल्याशिवाय टोल सुरू करण्यात येवू नये, अशा सुचना केल्या आहेत. त्यानुसार आता टोल सुरू होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

आज पासून टोल घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. सकाळ पासून पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर श्री. राणे यांनी याबाबत केंद्रीय अधिकार्‍यांशी चर्चा करून टोल वसूली बंद करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार ही टोल मुक्ती बंद करण्यात आल्याचा दावा श्री. राणे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा