You are currently viewing वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 124 मि.मी. पाऊस

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 124 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 124 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 58.75 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4858.331 मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे आहेत.

       दोडामार्ग – 67 (5182), सावंतवाडी – 30 (5177.60), वेंगुर्ला – 64 (4697), कुडाळ – 27 (4650.05) मालवण – 82 (5939), कणकवली 28 (4457), देवगड – 48 (4034), वैभववाडी – 124 (4730) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

       जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मालवण तालुक्यात 5 हजार 939 मि.मी. पाऊस झाला असून त्याखालोखाल दोडामार्ग तालुक्यात 5 हजार 182 मि.मी. आणि सावंतवाडी तालुक्यात 5 हजार 177 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी देवगड तालुक्यात 4 हजार 34 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 4 हजार 434 पुर्णांक 125 मि.मी. पाऊस झाला होता. गेल्या वर्षी पेक्षआ यंदाच्या वर्षी आजपर्यंत 424.206 मि.मी. अधिक पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 3 =