You are currently viewing आई

आई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम अभंग रचना*

*आई*

आई तूच मला | दाखविले जग
आनंदले मग | मन माझे ||१||

डोळे उघडोनी | बघितले सर्व
झाला मला गर्व | भरपूर ||२||

त्रास सोसूनिया | ठेविले गर्भात
दिसली प्रभात | आईमुळे ||३||

पोटात असता | त्रास तू साहले
कधी ना जाहले | दुःख तुला ||४||

शिकलो चालणे | धावणे बोलणे
तुझिया कारणे | मोठा झालो ||५||

होतो तुझा बाळ | केलास सांभाळ
दिधले आभाळ | प्रगतीचे ||६||

जगामध्ये मला | तूच दावी मार्ग
तुझ्या ठायी स्वर्ग | माझा असे ||७||

✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा