You are currently viewing तुमचा पत्ताच हरवला आता

तुमचा पत्ताच हरवला आता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री डॉ.राणी खेडीकर लिखित अप्रतिम पत्रलेखन*

 

*प्रिय बाबा*…

*तुमचा पत्ताच हरवला आता*

बाबा …. तुम्हाला पत्र लिहावसं वाटलं खुपदा पण आपण बोलत होतो ना रोजच. लहान असताना तुम्ही म्हणाले होतें पत्र लिहिता येतं काय तुला ? नाव कुठं लिहायचं ? पत्ता कुठं लिहायचा माहीत आहे काय? तेव्हा किती सोपं वाटलं होतं ते , तुमचा पत्ता माहीत होता ना मला …. आता कुठला पत्ता लिहू बाबा ….तेव्हा काय लिहावं तेच सुचत नव्हतं कदाचित पत्ता माहीत होता म्हणून . पत्ता हरवला आणि कीती बोलायचं होतं ,सांगायच होतं, विचारायच होतं तुम्हाला कीती महत्वाचं राहून गेलं सगळेचं…..वेळ कशी फितूर असते, आहे – आहे म्हणते आणि निघुन जाते. क्रिकेट बघताना तुम्ही किती बारकावे सांगायचे खेळा मधले. खेळ जिंकायचे किती tips किती strategies तुम्ही समजावून सांगायचे bowler किती प्रकारचे असतात faster, sppiner, पण batsman फक्त ball war consantrate करतो तो bowler चे pressure घेत नाही तो ball समजून घेतो off spin, leg spin त्याच्याकडे फिरत येणाऱ्या ball वर तो move करतो bowler चे pressuer घेणारा batsman ball समजू शकत नाही. किती वेळा आपण हे सगळे बोलत असु. पण आयुष्यात जिंकताना किंव्हा जिंकणे वगैरे असू द्या Normal जगायला या tips, strategies कामी पडतात का हो बाबा ?ते discuss करायचं राहूनच गेलं कारण तुम्ही होताच ना…….

आपण किती बोलायचो election आले कीं, कोणत्या पक्षाचे सरकार येणार हा तुमचा अंदाज किती तंतोतंत ठरायचा. कुठला मंत्री राजीनामा देणार, कोण कोणाशी गटबंधन करणार,आणि कोण वेळेवर पाठींबा काढून घेणार या तुमच्या राजकारणी अभ्यासाचे पाठांतर करून मी किती confidantly गप्पा हाकलत होते मैत्रिणीमध्ये माहितच नाही तुम्हाला, पण अडचणी च्या वेळेला आपण खूप जीव लावलेली माणसं अशीच पाठींबा काढून घेतात का हो बाबा? आपण जी आपली समझतो त्या माणसांसोबत गटबंधन निभावताना जीव गुदमरला तरी ते निभवायचं का बाबा? तेवढं विचारायच राहून गेल करण ……..तुम्ही होताच ना किती हट्ट करत होते मी तुम्ही ते पुरवत होतात. हट्ट धरून बसले की तो पूर्ण होतो हे समीकरण असतं असं वाटलं होतं मला पण हट्ट आणि तुम्ही असं समीकरण होतं ते. वयाच्या प्रत्येक वळणावर सगळ्यानी हजारदा “आता मोठी झालिस तू अस सांगीतल पण जेव्हा जेंव्हा मी तुमच्याकडे बघितल तुम्ही हसून नकारार्थी मान हलवली आणि मी परत परत वाढलेल्या वया सोबत लहान होत गेले. पहिल्यांदा शाळेत जाताना, collage मध्ये जाताना आणि लग्नानंतर घर सोडून जाताना पण तुम्ही “ मी थांबलोय बाहेर “ असे सांगत होतात आणि म्हणूनच मी विश्वासाने वावरत होते सगळीकडे यशाचे टप्पे गाठत होते. कधी झालेल्या जखमा, दुखावलेलं मन, पचवलेला अपमान सगळेचं नाही सांगितलं तुम्हाला पण एवढा भक्कम आधार होता तुमचा की, कुठेही अगदीच जीव गुदमरला, नाहीच सहन झालं तर तुम्ही बाहेर थांबला आहात हे माहीत होतं मला कारण…….. तुम्ही होताच ना.

तुम्ही आजारी पडले तेंव्हा खूप भीती वाटायची पण तुम्ही कायम तुमच्या खणखणीत आवाजात “ मला काय झालंय” म्हणून सगळी भीती क्षणात घालवून टाकायचे आणि मी निश्चित होत असे. तुम्ही बाहेर थांबलाय या विश्वासाने परत किल्ला लढवत होते.माझ्या प्रत्येक यशात तुम्हाला, मला 5 वित English मध्ये छान marks मिळालें तेंव्हा जेवढा आनंद झाला होता तोच आनंद तुमच्या चेहऱ्यावर असायचा. माझ्या सगळया गोष्टींचं तुम्हाला कौतुक होतं. बाबा खूप गोष्टी सांगायच्या की विचारायच्याचं राहून गेल्या कारण……तुम्ही होताच ना . तुम्ही बोलत होतात, चूक बरोबर असे वगैरेे काहीच नसतं .फक्त आपले भ्रम असतात कोणीतरी आखलेल्या रेषा असतात ज्या आपण विचार न करता पाळत असतो. खरे magic जे आपल्या कडून घडायचं असतं ते त्या रेषांच्या पलीकडे असतं . हे सगळं कुठे आणि कसं apply करायचं ते disscus करायचं राहूनच गेलं कारण….तुम्ही होताच ना . आता मी नीट आठवणार तुम्ही काय कधी बोलत होतात आणि तसं करण्याचा प्रयत्न करत राहणार तुम्ही काळजी करू नका बाबा माझी मी सांभाळण्याचा प्रयत्न करेन सगळं. तुम्ही शांत निवांत राहा खूप दमला असाल सगळ्यांचे करता करता .वाघा सारखे प्रत्येक प्रश्नाला तोंड देत होतात तुम्ही. विसावा घ्या आता .कोणाचीच, कसलीच काळजी करू नका बाबा तुमच्या एव्हढं काळीज नाही की सगळया संकटाना तोंड देऊन पुढे येणाऱ्या प्रश्ननाला ही उत्तर तयार ठेवता येईल असे, तस नाही जमलं तरी पण मी नीट बघेन सगळं. एक मात्रं होईल आता बाहेर बघण्याचं धाडस नाही होणार …… तुम्ही शांत झोपले होते तेंव्हा सगळे रडत होते खूप गर्दी झाली होती तुम्ही आता उठणार आणि ” बाळा आलीस का “ असं बोलणार असं वाटत होतं तेंव्हाच कोणी तरी बोललं “body नीट सांभाळा “तेंव्हा काळीज तुटलं बाबा……. डोकं सुन्न झालं, तुम्ही नसल्याचा पुरावा देत होते सगळे पण तरी “मी थांबलोय बाहेर” हे तुमचं बोलणं तेवढं आठवत होतं ……. ती जागा भरणे नाही आता. …… तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आवर्जुन करत होतात आणि तेव्हां तुम्ही लहान बाळा सारखे खुश असायचे एरवी वाघाचं कातडं पांघरून वावरणारे तुम्ही त्या क्षणात खरे जगत होतात आणि परत जणू नवीन ताकतीने आपलं वाघपण पांघरत होतात . कसं साधलं तुम्ही हे सगळं माहीतच नाही.सगळे शांत झाले जिवंतपणच नाही राहिला घरात… सगळे खूप मोठे झाले एकाएकी जणू दणदण वेगाने वाहणारा झरा क्षणात कुठे सामावून गेला कळेनास झालं …… तुम्हाला काही नाही सांगितलं तरी ,जखम तुम्हाला नाही दाखवली तरी, “तुम्ही आहात” या औषधाने ती भरत असे ….. आता जखमांचे लाड करायला तुम्ही नाही पण काळजी करू नका बाबा त्या ही शाहण्या होतील हळू -हळू आणि बधीर पण होत जातील …… तुम्ही म्हणायचे घर खूप जास्त टापटीप नीटनेटके असू नये जरा अस्ताव्यस्त असेल तर ते आपलंसं वाटतं … नाती पण अशीच असावी खूप अवघडली की ती परकी वाटू लागतात कृत्रीम होत जातात एकदा का ती कृत्रिम झाली की ओलावा, आपलेपणा संपत जातो. दक्षतेने वागता – वागता कधी जवळीक करपून जाते कळत पण नाही . खूप जड करू नये सगळ मोकळं, हलकं असू द्द्याव एक माणूस असा असू द्यावा आपल्या जगण्यात…….. आरशासरखा. आणि आपण ही असाव असं एखाद्या साठी. जेव्हां तुम्ही अस काही बोलत होतात त्याचा संदर्भ लागत नव्हता, पण अर्थ खूप मोठा होता कळला तरी वळणं अवघड आहे बाबा…

 

डॉ राणी खेडीकर

प्रतिक्रिया व्यक्त करा