You are currently viewing श्री देव बांदेश्वर – भूमिका देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी राजाराम सावंत यांची निवड

श्री देव बांदेश्वर – भूमिका देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी राजाराम सावंत यांची निवड

बांदा :

 

देवस्थान व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार खास ग्रामसभेत आज श्री देव बांदेश्वर – भूमिका देवस्थान उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी राजाराम सावळाराम सावंत यांची बहुमताने निवड करण्यात आली. या सभेसाठी ३५० हून अधिक नागरिक उपस्थित होते.

देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सावंतवाडी उपकार्यालयाकडून देवस्थानची स्थानिक व्यवस्था पाहण्यासाठी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ५६ अन्वये स्थानिक सल्लागार उपसमिती नियुक्ती करण्याचे निर्देश ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार बांदा ग्रामपंचायत सभागृहात खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, राजाराम सावंत, रत्नाकर आगलावे, साई काणेकर, रुपाली शिरसाट, शुभलक्ष्मी सावंत, तनुजा वराडकर, शिल्पा परब, रिया येडवे, देवल येडवे, रेश्मा सावंत, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये उपस्थित होते.

श्री बांदेश्वर – भूमिका देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती पुढीलप्रमाणे – अध्यक्ष राजाराम सावळाराम सावंत, सचिव – सचिव घनश्याम कृष्णा सावंत, सदस्य शंभुराव विवेक देसाई, रामदास परशूराम सावंत, गुरुनाथ गोविंद मेस्त्री, जयप्रकाश जनार्दन सावंत, वासुदेव विजय भोगले, प्रितेश नारायण शेटकर, आत्माराम लक्ष्मण बांदेकर, गोविंद केशव सावंत, रामा वासुदेव बांदेकर, आनंद महाजन, संतोष नारायण बांदेकर, सतिशचंद्र सोनू मोर्ये व विश्राम आत्माराम कानसे अशी १५ सदस्यीय समितीला ग्रामसभेने मान्यता देण्यात आली.

यावेळी श्री देव मठपर्वत देवस्थान सल्लागार उपसमिती नियुक्तीला सभेने मान्यता दिली. सदर समिती पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – महादेव शंकर वसकर, सचिव सुरज सुरेश मांजरेकर, खजिनदार – जीवबा भरत वीर, सदस्य विवेक विष्णू केळुसकर, सखाराम वसंत म्हावळंकर, दिवाकर अंकुश म्हावळंकर, सुप्रिया सुभाष नाईक, विठ्ठल तांबुळकर व महेंद्र बाळकृष्ण मांजरेकर.

सभेत देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नियुक्ती करावयाची असल्याने सभेला प्रचंड गर्दी झाली होती. समिती सदस्य निवडीवरुन किरकोळ वादावादी वगळता बहुतांश नियुक्ती बहुमताने झाली. यावेळी काही नागरिकांनी सभात्याग केला. सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. श्री देव विठोबा व श्री देव पाटेश्वर देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित नसल्याने या समित्या स्थापन करण्यात आल्या नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =