You are currently viewing जाग

जाग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जाग*

 

जन्मदात्री एक असे आपुली माता
स्मरुया दुसरी माय मराठी भाषा
शब्द अपुरे थोरवी त्यांची गाता
अस्तित्व उरते जो
बोलतो स्वभाषा

समर्थ वर्णमाला असे
माझ्या मराठीत
अक्षराची वळणे किती
देखणी सुबक
स्वराची अर्थपूर्ती होते
अचूक उच्चारात
रसपुर्ती गवसते काना मात्रा वेलांटीत

मर्म उमगते भावनेचे
बोलता मराठीत
नव्याने सौंदर्य खुलते
पहा बोलीभाषेत
संस्कृती,ज्ञान ,संस्कार
सारे मातृभाषेत
सांगा काय हो कमी
माझ्या मराठीत!

शिलालेख वदती तीची समुद्ध परंपरा
संतांनी संस्कृत सोपी
केली प्राकृतात
दडलेल्या थोर अर्थाचा अंगी आला वारा
मराठीनेच दिला दीप
लेखनाचा हातात

खुशाल मिळवा ज्ञान
अन्य भाषेतूनी
परी न विसरा जोडते मनास स्वभाषा
पहीला विचार स्फूरतो
माय मराठीतूनी
जरी कितीही बोलतो उत्तम परभाषा

भीक मागणे नकोच
तिच्या दर्जासाठी
आधी सारे बोलू, वाचू फक्त मराठीतूनी
एकमेकास जागवूया तिच्या गौरवासाठी
हवी जागृती करण्या
संवाद स्वभाषेतूनी

@ अंजना कर्णिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 16 =