You are currently viewing कुडाळ मालवण तालुक्यातील 8 ग्रा.पं. मध्ये सरपंच भाजपचे असले तरी उपसरपंच शिवसेनेचे बसणार

कुडाळ मालवण तालुक्यातील 8 ग्रा.पं. मध्ये सरपंच भाजपचे असले तरी उपसरपंच शिवसेनेचे बसणार

शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या जास्त…

कुडाळ मालवण तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत. सरपंच पदाची थेट जनतेतून निवडणूक झाल्याने अवघ्या काही मतांच्या फरकाने भाजपचे सरपंच निवडून आलेल्या 8 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या 8 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे उपसरपंच बसणार आहेत.

त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील शिवापूर ग्रा.प.मध्ये 7 पैकी 5 सदस्य शिवसेनेचे आले आहेत. महादेवाचे केरवडे येथे 7 पैकी 4, हळदीचे नेरूर येथे 9 पैकी 6, कवटी येथे 7 पैकी 5, हुमरस येथे 7 पैकी 4, तर मालवण तालुक्यातील किर्लोस येथे 7 पैकी 6, माळगाव येथे 7 पैकी 6 सदस्य शिवसेनेचे आले आहेत. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेचे उपसरपंच बसणार आहेत.तसेच बांधिवडे खुर्द कोईळ येथेही बिनविरोध उपसरपंच बसणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + two =