You are currently viewing बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार

*बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार*

*एका आठवड्यात नाला साफसफाईच्या २७८ तक्रारी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाल्याच्या साफसफाईबद्दल तक्रारी नोंदवण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केल्याच्या एका आठवड्यात २७८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तथापि, त्यांच्या अहवालात, स्ट्रॉम वॉटर ड्रेन (एसडब्ल्यूडी) विभागाने नमूद केले आहे की यापैकी एकही तक्रार नाल्यांचे अयोग्य गाळ काढण्याशी संबंधित नाही. बहुतांश तक्रारी नाल्यांमधील तरंगणारे साहित्य आणि कचऱ्याच्या आहेत, असा दावा एसडब्ल्यूडीने केला आहे.

म्हणून, एसडब्ल्यूडीने घनकचरा व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम) विभागाला पत्र लिहून नाल्यांमधील कचऱ्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे, परंतु सदरचे नाले आपल्या अखत्यारीत नाहीत असे कारण देत त्यांनी हे पत्र नाकारले आहे.

अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एसडब्ल्यूएम विभागाला प्रभागनिहाय एजन्सी तैनात करण्यास सांगितले होते. परंतु अन्य अतिरिक्त आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या एसडब्ल्यूएमच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर नागरी संस्थेने तक्रार निवारण क्रमांक सुरू केला. १ जून रोजी ही सेवा सुरू झाली आणि आठवडाभरात २७८ तक्रारी आल्या. परंतु एसडब्ल्यूडीने सांगितले की, विभागांतर्गत येणाऱ्या प्रमुख नाल्यांबाबत केवळ १०२ तक्रारी होत्या. त्यापैकी ५० टक्के तक्रारी पूर्व उपनगरातील होत्या. या समस्येचे निराकरण केल्यानंतर किमान ८९ तक्रारी बंद करण्यात आल्या, तर १३ तक्रारी निराकरण करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

महानगरपालिकेने शहरातील नाले आणि नद्यांमधून ११.५२ लाख टन गाळ काढला आहे जो लक्ष्यित प्रमाणापेक्षा १७ टक्के जास्त आहे. एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे, या वर्षी साफसफाईची प्रक्रिया लवकर सुरू झाली आणि ती अंतिम मुदतीच्या एक आठवडा आधी पूर्ण झाली.

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा