*कोल्हापूरात भरले “गझल प्राविण्य” परिवाराचे पहिले वहिले संमेलन….*
आदरणीय प्रवीण शरद पुजारी सर आणि त्यांच्या ‘गझल प्राविण्य’ परिवाराचे पहिले वहिले स्नेह संमेलन ‘अमृतधारा
फार्म’, नरकेवाडी, कोल्हापूर येथे दिनांक ०५ जून २०२३ रोजी थाटात पार पडले.
अमृतधारा फार्म हे सृष्टीच्या सानिध्यात असलेले अतिशय रमणीय स्थळ संमेलनासाठी निवडले त्या बद्दल सरांचे कौतुक करावे तितके थोडेच. पिकनिक-स्पॉट म्हणावा असा मनाला प्रसन्न, आल्हाददायक उर्जा देणारी इथली जागा. येथे राहायची टुमदार कॉटेज व त्यांची नावे ही पहा ‘पंचगंगा, गोदावरी, तुळशी, सह्याद्री अशी, म्हणजे जणू निसर्गाच्या कुशीत शिरल्या सारखेच वाटावे. सभोवताली हिरवाईने नटलेले मैदान अहाहा! नुसते बघून डोळ्याचे पारणे फिटले.
दिनांक ०४ जून २०२३ ला संध्याकाळी तिथे जमायचे होते. त्याप्रमाणे पूर्वतयारीसाठी काही जण दोन तारखेलाच आले तर काही चार तारखेला संध्याकाळी व उरलेले पाच तारखेला सकाळी पोचले. नरकेवाडीला व घरी कोल्हापूरला आमच्या शर्वाणी वहिनीने त्यांचे औक्षण करून प्रेमळ स्वागत केले. चहा भजी खाल्ल्या नंतर सर्वांनी भोवतालच्या सृष्टीच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. नंतर संध्याकाळी चिकूच्या बागेत जमलेल्या सर्वांनी आप आपल्या अंगातल्या कला प्रगट केल्या. कुणी गोड-गोड गाणी म्हटली तर कुणी नृत्य केले तर कुणी ललित लेखनाचे वाचन केले. रात्रीचे जेवण तर वाह! सुधाताईने सरांच्या घरी बनवलेल्या गरमा गरम जिलब्या, शेवयाची खीर आणि अगोदर तिथे झालेल्या पार्टीचा केक वाह! मस्तच झाला डीनर.
नंतर सरांनी ‘कधी कधी’ व ‘आहे ‘ हे रदीफ घेऊन शेर तयार करायला सांगितले. ह्यात सर्वांनी एकापेक्षा एक असे दर्जेदार शेरांची मैफिल सजवली.
एवढ होई पर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते. काही जण झोपायला गेले तर काही जण एडमीन सकट दुसऱ्या दिवसाच्या स्टेज तयारीला लागले व त्या बरोबरच गझलेबद्द्ल सरांशी भरपूर गप्पा मारल्या. खयाल, राबता ह्या वर बऱ्याच शंकांच निरसन ही झाले. रात्रभर जागायचे ठरवले होते तरी निद्रादेवी प्रसन्न झालीच आणि सगळे झोपेच्या अधीन झाले.
गझल प्राविण्य परिवारची स्थापना आदरणीय गुरू प्रवीण पुजारी सरांनी १५ मे २०२० ला केली होती. कोरोनाची दोन वर्षे असल्याने परिवाराला एकत्र येताच आले नाही. ह्या तिसऱ्या वर्षी मात्र सगळ्यांनी भेटायचेच असे ठरवले व
त्याप्रमाणे एप्रिल महिन्यापासून स्नेह संमेलनचे मनसुबे रचू लागले. सरांच्या व प्रणवच्या यथक परिश्रमाने आजच्या संमेलन व स्थळ पक्के केले.
परिवाराचे संमेलन हे कमीत कमी खर्चात व सर्वांना भरपूर आनंद व समाधान देणारे असावे ह्याच उद्देशाने सरांनी या संमेलनाचे आयोजन व नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने केले.
सकाळी मोकळ्या मैदानात मॉर्निंग वॉक, नंतर चहा व संमेलनाला तयार झाल्यावर कोल्हापूरी झणझणीत भरपूर मिसळ व त्यावर कडकडीत चहा. अहाहा! किती किती मजा.
बाकीच्या संमेलनासारखे इथे काहीच बढेजाव नव्हता. ना पालखी, ना दिंडी, ना पुस्तक प्रकाशन सोहळा, ना बाहेरचा अध्यक्ष वा अतिथी. सगळे परिवारातीलच लोक होते. आपले आदरणीय गुरूच संमेलनाचे अध्यक्ष होते. परिवारातला वयाने सर्वात लहान असलेला चि. श्रेयश भोइटे व वयानुसार
सर्वांत जेष्ठ असलेल्या सुधाताई नरवाडकर ह्यांनाच अतिथीचा सन्मान दिल्याने आगळ्या वेगळ्या संमेलनाने प्रत्येकाच्या मनात एका सुंदर नात्याची प्रेमळ नाळ जोडली गेली.
अध्यक्ष आ. प्रवीण सरांच्या हस्ते बॅनरवरचे रीबीन कापून अतिशय सुंदर पद्धतीने संमेलनाचे उद्घाटन केले. प्रवीण सर. श्रेयश, सुधाताई, आसावरी ताई व प्रणवने दिप प्रज्वलन केले. तदनंतर सर व प्रणव नी आदरणीय गझल सम्राट सुरेश भटसाहेबांच्या व विद्या देवता शारदा मातेच्या प्रतिमेला पुष्प हार घालून वंदन केले. सुधाताईनी सुरेल शारदा वंदन म्हटले व निशा ताईंनी मंगलाचरण म्हटले व सरांच्या चिमुकली ओजस्विताने अतिशय सुरेख गणेश वंदन नृत्य सादर केले.
आसावरी ताई व योगिता ताई दोघी बहिणींनी काढलेल्या सुंदर रांगोळीने सर्वांची मने प्रफुल्लित झाली. आदरणीय प्रवीण सरांचा मा. प्रणव ने शाल व पुष्पगुच्छाने सत्कार केला तसेच आ. प्रवीण सरांनी शाल व पुष्पगुच्छाने चि. श्रेयश व मा. सुधाताईचा सन्मान केला.
प्रणवजीने मोजक्या पण सुंदर शब्दांनी प्रस्तावना केली व नंतर सुत्रसंचालनची बाजू मा. नंदिनी ताई व मा. संजनाने साभांळली. पहिल्या मुशायरला सुरुवात श्रेयशने आपल्या गझलेने केली. नंतर एका नंतर एक प्रत्येकाने आपली गझल सादर केल्यावर दुसऱ्या गझलकारास आमंत्रित करून सूत्रसंचालनाचाही अनुभव घेतला.
मध्यंतरी गार कोकम पेयाचाही सर्वांनी स्वाद घेतला. एका पेक्षा एक अशा जबरदस्त शेरांचा मुशायरा संपल्यावर दुपारच्या जेवणाला पुरणपोळीचा थाट होता. सर व बाकीचेही आग्रह करून प्रत्येकाकडे जातीने लक्ष देत होते.
जेवणानंतर नंतर सर्व परिवार सदस्यांना ट्रॉफी, डायरी व पेन देऊन सरांनी सन्मानित केले. त्याच प्रमाणे गझलकारां बरोबर आलेल्यांचाही सरांनी सत्कार केला.
शेवटी सर्व एडमिननी पसायदानाने संमेलनाची सांगाता केली. चार वाजता माहेरचा आहेर व हृदयात भरपूर प्रेमाची शिदोरी घेऊन जड अंतःकरणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
खाली जमेल तेवढे फोटो शेयर करते. बघा व अमृतधारा फार्म व तिथल्या सृष्टी सौंदर्याची व संमेलनची अनुभूती घ्या.
धन्यवाद🙏🌹
शोभा वागळे
पुणे
8850466717
संवाद मिडिया*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*उपलब्ध कोर्सेस*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*
*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*
*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*
*आमची प्रवेश केंद्रे -:*
*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639
*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198
*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383
*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071
*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211
*Advt Link*
———————————————-