You are currently viewing शब्द म्हणजे शस्त्र”

शब्द म्हणजे शस्त्र”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर (मिशिगन, अमेरिका) लिखित अप्रतिम लेख*

*”शब्द म्हणजे शस्त्र”*(लघु लेख)

एखादे सुंदर चित्र पाहून सहजच पाहणार्‍याच्या मुखातून निघालेले शब्द “वाहवा” किंवा “amzing” ही त्याची मनापासून निघालेली प्रतिक्रिया असते. कसबी गायक मुक्त स्वरसंचार करून जेव्हा समेवर येऊन धडकतो तेव्हा रसिकांची मिळालेली “दाद”,सांभाळून जा रे” हे आईचे प्रेमाचे शब्द,रस्त्यावर घडलेली एखादी दुर्घटना पाहून “अरेरे” हे मुखावाटे निघालेले उद्गार म्हणजे माणसाच्या भावना व्यक्त करण्याचे फार मोठे साधन आहे, शस्त्र आहे.
शब्द शब्द मिळून भाषा तयार झाली आणि दोन व्यक्तींत संवाद सुरू झाले. मग ते संवाद असतील,विसंवाद असतील नाहीतर वितंडवाद असतील.आपली मते मांडण्याचे ते एक अत्यंत प्रभावी हत्यार बनले,शस्त्र बनले.
शब्द कधी सोपेसरळ तर कधी वक्र,कधी मधूर तर कधी तिखट,कधी मवाळ तर कधी जहाल,कधी प्रेमळ तर कधी करूण,कधी सुखद तर कधी दुःखद,कधी धारदार तर कधी बोथट,पण प्रत्येक शब्दाची ताकद वेगळी.
साधी माणसे सरळ सरळ बोलून आपल्या विविध भावना व्यक्त करतात आणिअलंकारिक शब्दांची गुंफण करून कवींचा भावनाविष्कार होतो.सुरेश भटांसारख्या गझलकाराच्या
*आता असे जगायचे माझे किती क्षण राहीले*
*माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहीले*
*ह्रदयात विझला चंद्रमा नयनी न उरल्या तारका*
*नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहीले*
ह्या ओळी वाचल्या,ऐकल्या की आपोआपच शब्द फुटतात “क्या बात है!”

*जुने जाऊद्या मरणालागुनी*
*जाळुनी किंवा पुरूनी टाका*
*सडत न एक्या ठायी ठाका*
*सावध ऐका पुढल्या हाका*
असे जहाल शब्द हे केशवसुतांचे जनजागृती
करण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र असते.
शब्दांतूनच जीवनोपयोगी संदेश मिळतात,शब्दांतूनच ऊपदेश करता येतो.
*शब्दावाचून जगणे नाही*
*शब्दावाचून तरणे नाही*
*शब्द भात्यातील बाण*
*शब्दच वाचवतील प्राण*

*अरूणा मुल्हेरकर*
*मिशिगन*

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा