You are currently viewing Movie Theatre (चित्रपटगृह) ओपन होणार…

Movie Theatre (चित्रपटगृह) ओपन होणार…

 

नवी दिल्ली :

 

केंद्र सरकारने देशभरात चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपासून देशात चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स सुरू होणार आहेत. यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे आणि ५० टक्के क्षमतेने त्यांना परवानगी देण्यात आली आहे, असे जावडेकर म्हणाले. चित्रपटापूर्वी कोरोना संदर्भात जनजागृती करणारी एका मिनिटांची शॉर्ट फिल्म अथवा एक घोषणा करणे अनिवार्य आहे. तसेच ऑनलाइन तिकिट आरक्षित करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.

केंद्रीय गृह मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून देशभरात ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिल्याने गेले सहा महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांना आशेचा किरण दिसू लागला आहे. निर्णय देशातील त्या-त्या राज्यांवर अवलंबून आहे. जर राज्यांनी चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास आणि ती सुरू झाल्यास दसरा-दिवाळीत उत्पन्न घेता येईल, असे चित्रपटगृह मालकांकडून सांगितले जात आहे.

गेल्या ६ महिन्यांत चित्रपटगृहे बंद असल्याने देशभरातील चित्रपटगृह व्यवसायाचे तब्बल ३००० कोटींचे नुकसान झाले आहे. यात केवळ हिंदी चित्रपटांचे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान दोन महिन्यांत भरून येणे शक्य नाही. मात्र, दसरा आणि दिवाळी हा मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात सगळीकडेच व्यवसायाच्या दृष्टीने सुवर्णकाळ मानला जातो. या महिन्यांत सगळीकडे चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत चित्रपटगृह मालकांना व्यवसायाची घडी बसवण्यासाठी मदत होईल, असे मत ‘सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्झिबिशन असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन दातार यांनी व्यक्त केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =