पाडलोसमध्ये गव्याची दुचाकीस्वाराला धडक…..

पाडलोसमध्ये गव्याची दुचाकीस्वाराला धडक…..

थोडक्यात अनर्थ टळला; प्रवाशांत भीतीचे वातावरण

बांदा

मडुरा येथून परतत असताना पाडलोस केणीवाडा येथे दुचाकीस्वाराला महाकाय गव्याने धडक दिली. दुचाकीच्या पुढील चाकाला धक्का देत गव्याने साळगावकर यांच्या बागेत पलायन केले. तर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने अजून पाच गव्यांचा कळप येत असल्याचे पाहताच मोठ्याने हॉर्न वाजवून सर्वांना सावध केले. त्यामुळे त्या गव्यांनी गाडीच्या दहा फूट समोरून पळ काढला.

प्रतिक्रिया व्यक्त करा