You are currently viewing जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फॉर फ्युचर इंडियाचे भाईंदर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फॉर फ्युचर इंडियाचे भाईंदर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फॉर फ्युचर इंडियाचे भाईंदर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

फॉर फ्युचर इंडिया या पर्यावरणवादी युवा संस्थेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाईंदर येथील वेलंकनी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविले. सदर संस्था गेली साडे-तीन वर्षे मिरा भाईंदर व मुंबई शहरातील समुद्रकिनारे स्वच्छ राखण्याचे कार्य अविरतपणे करत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मॅन्ग्रोव्हस फौंडेशन, ब्लॉसम हाईं स्कूलच्या शिक्षक, आदर्श मसाले कंपनीचे पदाधिकारी व कर्मचारी, एचएलए संस्था, मिरा भाईंदर स्वच्छता/आरोग्य विभाग सोबतच इतर महाविद्यालीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी जवळपास २ टन इतका प्लॅस्टिक व इतर मिश्र कचरा काढण्यात यशस्वी झाले. यावेळी प्रामुख्यने मासे पकडण्यात वापरात येणाऱ्या जाळीचे तुकडे मोठ्या प्रमाणत होते. यामुळे जलचर प्राण्यांना मोठ्या प्रमाणत हानी पोहचत आहे, याची जाणीव करून देण्यात आली. तसेच इतर शहरातील सहभागी लोकांना प्लॅस्टिकचा वापर कसा टाळता येईल याबद्दल जागरूकता करण्यात आली.
“समुद्रकिनारे स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे मानवनिर्मित तयार होणार कचरा किंवा सांडपाणी जे जलचर प्राण्यांच्या जीवनावर अत्यंत गंभीर परिणाम करत आहे. यामुळेच लाखो जलचर प्राणी या प्रदूषणामुळे आपला जीव सोडत आहेत. याचा गंभीर विचार करणे गरजेचे आहे. तसेच समुद्रकिनारे हे स्थानिक पर्यटकांसाठी आणि परदेशी पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळे आहेत. जर त्यांची योग्यप्रकारे स्वच्छता केली नाही तर त्यांच्या नजरेत वाईट प्रतिमा निर्माण होईल. त्यामुळे आपल्या शहराची प्रतिमा जपण्याची जबाबदारी आपली आहे असे आम्हाला वाटते. याच विचाराने आम्ही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे.” असे हर्षद ढगे, फॉर फ्युचर इंडिया – अध्यक्ष/संस्थापक यांनी सांगितले.

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा