*जिल्हावासियांनी आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सहभागी करून घ्यावे : मनीष दळवी*
कुडाळ प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कामळेवीर शाखा नविन एटिएम चे उद्घाटन जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या सोहळ्या प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी बोलत होते.
आजकाल सर्वत्र डिजीटल जमाना सुरू झाला आहे. यापुढे बँकेत जाउन पैसे काढणे काही वर्षांनी कालबाह्य होईल. एटिएम मशिन, मायक्रो एटिएम, इंटरनेट मोबाईल बँकींग या सा-या सुविधा प्रक्रीया अधिक वेगाने सुरू झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्व जिल्हावासयांची, शेतक-यांची, सर्वसामांन्याची बँक असुन बँकेच्या माध्यामातून इंटरनेट बँकिंग, मोबा बँकिंगद्वारे अनेक सेवा, सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हावासियांनी या सर्व सेवा सुविधांचा वापर करावा. यापुढे व्यापा-यांना बँकेच्या मर्चंट अँपद्वारे सर्व आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. जिल्हावासियांनी बँकेच्या या डिजीटल वाटचालीमध्ये मोलाची साथ द्यावी तसेच आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सहभागी करून घ्यावे असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी कामळेवीर येथे केले.
या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, झाराप सरपंचा सौ.दक्षता मेस्त्री, नेमळे गावच्या सरपंचा सौ.दिपीका भैरे, आकेरी वि.कार्यकारी सह. सोसायटी आकेरी चे अध्यक्ष बाळकृष्ण राउळ, नेमळे कौल कारखाना चेअरमन आत्माराम राउळ, जिल्हा बँकेचे मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे कामळेवीर शाखा व्यवस्थापिका सौ.सुनेला शिंदे, तालुका विकास अधिकारी शामसुंदर सरमळकर, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी नेमळे, झाराप, कामळेवीर गावातील ग्रामस्थ, ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कामळेवीर येथील विठ्ठल कोरगावकर व यशवंत वेंगुर्लेकर यांना एटीएम कार्ड जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बँक संचालक प्रकाश मोर्ये व विद्याधर परब यांनी उपस्थितांना बँकेच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदवा व बँकींग सुविधांचा लाभ घेत कामळेवीर शाखेकडील आर्थिक व कर्ज व्यवहार, ठेवी वाढविण्यासाठी मोलाची साथ देण्याचे आवाहन उपस्थितांना यावेळी केले.