You are currently viewing जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने ५० अंधांना पांढरी काठीचे वाटप

जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने ५० अंधांना पांढरी काठीचे वाटप

*भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर ते १५ नव्हेंबर या कालावधीत दिंव्याग संपर्क अभियान राबविणार*

 

कुडाळ :

जागतिक पांढरी काठी दिनानिमीत्त भाजपा दिंव्याग विकास आघाडी च्या वतीने कसाल येथील सिद्धिविनायक हाॅल मध्ये दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ५० अंधांना पांढरी काठीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कसाल एस्. टी. स्टॅंड ते सिद्धिविनायक हाॅल (कसाल बाजारपेठ) पर्यंत दिव्यांगांनी रॅली काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं.

त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या अधिकारयांनी शासनामार्फत देण्यात येणारया योजनांची माहिती दिव्यांगांना दिली. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते अंधांना पांढरी काठीचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना विशाल परब म्हणाले की आज मला दिव्यांगांची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. दिंव्यागांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासनाचा योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी प्रधानमंत्री विकलांग योजना २०२२ या योजने अंतर्गत ५ लाखा पासुन ते २५ लाखापर्यंत कमी व्याजदर असलेल्या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले. तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिंव्याग विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांचाही फायदा घ्यावा तसेच केंद्र सरकारच्या दिनदयाळ विकलांग पुनर्वसन योजनेचाही फायदा घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी भाजपा दिंव्याग विकास आघाडी चे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी दिनांक १५ ऑक्टोबर ते १५ नव्हेंबर या कालावधीत जिल्हा भरातील दिव्यांगांशी संपर्क करुन *दिव्यांग संपर्क अभियान* राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.


यावेळी व्यासपीठावर भाजपा दिंव्याग विकास आघाडी चे सरचिटणीस शामसुंदर लोट, चिटनीस सुनील तांबे, कुडाळ तालुका संयोजक विजय कदम, दिक्षा तेली, स्वाती राऊळ, संगीता पवार, रविंद्र शिरसाठ इत्यादी उपस्थित होते. या दिव्यांग मेळाव्याला जिल्ह्यातील २२५ दिंव्याग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा