You are currently viewing प्रिय पप्पा

प्रिय पप्पा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित भावस्पर्शी लेख*

*प्रिय पप्पा*

आज ३१मे. तुम्हाला जाऊन ४१ वर्षे उलटली. मी सुद्धा आता ७५ वर्षांची झाले. पण पप्पा तुम्हाला जेव्हां जेव्हां मनाच्या गाभाऱ्यात मी हाक मारते तेव्हा, मी पुन्हा कितीतरी लहान होते. सतत जाणवते तुम्ही आहातच. तुमचं अस्तित्व आहेच. तुमचे शब्द, तुमची वाणी, कानात घुमते आणि तुमची ती तेजस्वी नजर आजही आमच्या जगण्याचे मार्ग उजळवत राहते.

हॉलमधल्या टेबलावर तुमचा लेखन, वाचनाचा पसारा सदैव पसरलेला असायचा. तुम्ही गेल्यानंतर अत्यंत जड मनाने आम्ही तो आवरत होतो. त्यात तुमची डायरी होती. डायरीची पाने चाळता चाळता, शेवटच्या काही पानावर तुमच्या हस्ताक्षरातील काही वाक्यं काळजाला भिडली होती. तुम्ही लिहीले होते
“मृत्यू हेच सत्य आहे. जेव्हा आत्मा निघून जातो तेव्हा उरतो फक्त देह. शरीरातून प्राण निघून जात असताना त्या देहाभोवती प्रियजनांनी शोक करू नये. जीवनाचा एक चलत चित्रपट जाणारी व्यक्ती मिटलेल्या डोळ्यांच्या अवकाशात पहात असते. त्यात अडथळा निर्माण होतो.”

” मृत्यू हे सत्य आहे आणि ते अटळ आहे. जे बदलता येणार नाही त्याचा स्वीकार करावा.”

” जेव्हा मी हे जग सोडून जाईन तेव्हा मला सर्व इथेच सोडून जायचं आहे. तुमच्या डोळ्यातले अश्रू माझ्या पुढच्या प्रवासात मला मुक्तपणे पावले उचलू देणार नाहीत. म्हणून शोक आवरा.”
असं बरंच काही तुम्ही लिहिलेलं होतं. आजही मला ती अक्षरं स्पष्ट दिसतात आणि वाटतं त्याही वेळी तुमचाच मृत्यु आम्ही कसा पाहावा, पेलवावा यासाठी जणू हे तुमचेच सांत्वन पर शब्द होते.

आजही वाटतं कळत नकळत तुम्हीच आखून दिलेल्या मार्गावर आम्ही चालत राहिलो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची जगण्याची थीअरी आम्हाला मार्ग दाखवत राहिली. खरं म्हणजे तुम्ही आमचे सायलेंट गुरु होतात. तुम्ही कधीच आमच्यावर तुमची मते लादली नाहीत. हेच करा तेच करा असं म्हटलं नाहीत. हे चांगलं आहे ते वाईट आहे असं ही कधी सांगितलं नाहीत. कधी अडवलं नाहीत कधी विरोध केला नाहीत. ज्याला जे करायचं ते करू दिलत. तुमच्या सहवासात एक मुक्त स्वातंत्र्य— विचारांचं आचारांचं आम्ही अनुभवलं.
पण पप्पा तुम्हाला तेव्हा अशी भीती वाटली नाही का की आमच्या ओंजळीत तुम्ही टाकलेलं स्वातंत्र्य आम्हाला बिघडवू शकत होतं?

मला माहित आहे तुमचं उत्तर .
“तुमचं तुम्हालाच कळू दे काय चांगलं काय वाईट. खरं काय खोटं काय हे ठरवण्यापूर्वी तुम्ही तुमचे अनुभवांचे निकष लावा. विरोधात विद्रोह असतो. माणसाला एखादी गोष्ट कोणी करू नका असं सांगितलं तर तो तेच करण्यासाठी उत्सुक होतो. नव्हे कधी तो त्यासाठीच विद्रोही बनतो. म्हणून करण्याचे व न करण्याचे फायदे, तोटे तुमचे तुम्हालाच कळू दे.”
ही तुमची थीअरी. जे. कृष्णमूर्तींची तत्त्वं तुमच्या जगण्यात मुरलेली होती. तेव्हा तुमचे आणि माझे प्रचंड वाद व्हायचे. मला तुमचं काहीही पटायचं नाही. मात्र तुमच्या विद्वत्ते पुढे माझं मौखिक वैचारिक चातुर्य दुर्बळ असायचं. पण तरीही तुम्ही वेळोवेळी शांतपणे ऐकून घेतलंत. मला बोलूही दिलत.

तुमची अनेक वाक्यं, अगदी सहजपणे उच्चारलेली पण आमच्या जीवन सागरात ती दीपस्तंभासारखी ठरली.
“आनंद आहे..”
” गेली ती गंगा आणि राहिलं ते तीर्थ
” वृक्ष नाही झालात तरी चालेल पण लव्हाळी बना.” ।महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती।
” म्या तुझं मणं पाह्यलं”
अशी अनेक वाक्य. मेंदूंच्या अगदी आतल्या भागात रजिस्टर झालेली आहेत आणि खडतर वाटेवर त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे.
तुमचं,” म्या तुझं मणं पाह्यलं” हे वाक्य जेव्हां मी माझ्या नातींना सांगते तेव्हा त्यांना खूप मजा वाटते. पण या वाक्यात केवढा अर्थ आहे पटकन लक्षात येणार नाही पण संपूर्ण गीतेचं ज्ञान जणू त्यात साठवलेलं आहे याची आता जाणीव होते.
मी तुझ्या मनाची परीक्षा घेतली असा साधा अर्थ. पण तुझं मन किती स्थिर आहे, किती निष्काम आहे, किती चंचल आहे, स्वार्थी आहे ,किती आत्मकेंद्रीत आहे, किती उथळ आहे, किती खोल आहे, बाह्यभावी आहे की अंत:र्यामी आहे —हे सारं मी जाणून घेतोय.

पप्पा धन्य आहे तुमची!
तुमच्यासारखे वडील आम्हाला लाभले, ज्यांनी आम्हाला जगण्याची कला शिकवली, निसर्ग, संगीत, लेखन, वाचन जे जे सुंदर त्याची ओढ लावली आणि आमचं अवघं जीवन सौंदर्यानेच नटवलं.
A THING OF BEAUTY IS JOY FOR EVER.
हेच शिकवलत. सकारात्मकता ही आमच्या ठायी मुरवलीत म्हणून आम्ही कधी अपयशातही हरलो नाही.

आम्ही किती भाग्यवान! लिहाव तितकं थोडं आहे पप्पा.
पप्पा पाच महिन्यापूर्वी आपला,” एक होता निजाम” आम्हाला सोडून गेला. तुमची आणि तिची स्वर्गात भेट झाली का हो? आता तिथेही तुम्हाला तिची सुप्रसिद्ध कथा ती सांगत असेल ना?” एक होता निजाम” तिला तुम्ही म्हणाला असाल'” बाबी आता तुझी सारी दुःख संपली. आता फक्त आनंद आहे.”

पप्पा मी जिजी वर पुस्तक लिहिलं. तिच्या आठवणी शब्दबद्ध केल्या. छुंदाने पुस्तक प्रकाशनाचा सोहळा अप्रतिमपणे आयोजित केला होता. मला तेव्हाही सतत वाटत होतं, पोडीअमवरुन तुम्ही मला शाबासकी देत आहात. तुमच्या प्रिय आईच्या आठवणीत तुम्हीही भिजून गेला आहात.

तुम्ही गेलात हे खरं नाही. तुम्ही म्हणजेच आमचा आत्मा. आणि आत्मा अमर आहे म्हणून आमच्यासाठी तुम्ही अमरच आहात पप्पा…

तुमची लाडकी, हट्टी, बंडखोर खचकु.

बिंबा.

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

३१मे

प्रतिक्रिया व्यक्त करा