१९ जून रोजी उबाठा राष्ट्रवादीत विलीन होणार याची अधिकृत घोषणा
कणकवली
ज्यांच्या हातात पक्षच राहिला नाही ते वर्धापन दिन साजरा कसा करू शकतात.राजकीय लावारीस असलेल्यांनी दुसऱ्याचे आईवडील मोजू नयेत.महाविकास आघाडी स्थापन होत असताना शकुनी मामा खासदार संजय राऊत ने २०० कोटीची दलाली घेतली. आता उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी आणि उभाठा सेना राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी १०० कोटींची दलाली ठरलेली आहे.१९ जून रोजी उबाठा राष्ट्रवादीत विलीन होणार अशी घोषणा उद्धव ठाकरे स्वतः करणार आहेत अशी माहिती भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी माध्यमंशी बोलताना दिली ते ओम गणेश निवास साठी पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंचा तीनपाट कामगार मोदी सरकार वर टीका करत आहे.त्याची लायकी किती आणि बोलतो किती याचा विचार करावा.संजय राऊत याचे दलालीवर आयुष्य चालते. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कारभारामुळे दहशदवादी, भ्रष्टाचारी याना आळा घातला.म्हणून तुझ्या मालकासारखे ज्यांची काळा पैसा करायचा काय यामुळे फाटली आहे. त्यांच्या नाकीनवं आले आहे. म्हणून दिवसाला चार वेळा डॉक्टर बोलवा लागतो.
तुझा मालक अडीज वर्षे मुख्यमंत्री होता तेव्हा त्याने फेसबुक लाईव्ह चा सपाटा लावला होता. तेव्हा का नाही पत्रकारांसमोर आला.पत्रकार परिषद घेतली तरी बाजूला अजित दादा असायचे चिठ्या पाठवायचे आणि हा बावळटासारखा बोलायचा.त्यामुळे दुसऱ्यांना उपदेश करणे राऊत यांनी आधी बंद करावे.
महाराष्ट्र म्हणजे पाटणकर आणि पाटणकर म्हणजे महाराष्ट्र हे तुझ्या मालकाच घोष वाक्य होत. मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षात या पलीकडे काही केलेले नाही. सगळा विकास पाटणकर यांच्या घरात घातला. महाराष्ट्र पाटनकरच्या दावणीला बांधला होता. असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.
भाजपाच्या झेंड्यावर बोलण्याची यांनी हिम्मत केली.मात्र लायकी आहे काय तेवढी हे आधी तपास.तुझ्या मालकाजवळ झेंडा नाही, काठी पण राहिली नाही.भाजपा चा झेंडा हिंदुत्वाचे प्रतीक आहे.मात्र तुम्ही आयुष्यभर मराठी माणसाला संपवले. मुंबईतून मराठी माणसाची टक्केवारी कमी झाली ह्याला मालक जबाबदार आहे.
व्यापारी आणि शेटजी चा पक्ष म्हणून भाजप व टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी आपला मालक उद्धव ठाकरे लंडनला गेला आहे तो कोणाच्या पैशावर याचे उत्तर द्यावे.उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यात हॉटेलचे बिल कोण देताय शॉपिंगचे बिल कोण देते हे बोलायला लावू नका असा गर्भित इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
मुंबई महापालिकेवर भाजपाचा सेना युतीचाच भगवा झेंडा फडकणार आहे.असे सांगताना आमदार नितेश राणे म्हणाले,१९ जून रोजी उबाठा राष्ट्रवादीत विलीन होणार अशी घोषणा उद्धव ठाकरे करणारच करणार आहेत.१९ जून ला शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा उद्धव ठाकरेना अधिकार नाही. शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच वर्धापन दिन साजरा करेल तीच अधिकृत शिवसेना असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
गौतमी पाटील चांगली कलाकार आहे.तिला पाहून लोकांची सकाळ चागळी जाते आणि राऊत ला पाहून लोकांची सकाळ खराब होते. त्यामुळे गौतमी पाटील बनण्याचा प्रयत्न संजय राऊत ने करू नये. माजी मंत्री सतेज पाटील यांच्या कडे दंगली घडतील अशी काही माहिती असेल तर त्यांनी ती गृहखात्याला द्यावी . कदाचित त्यांना मातोश्रीवरून माहिती आली असेल कारण दंगली तिकडून घडविण्याची शक्यता आहे.विरोधकांना आमच्या विरोधात बोलण्यासाठी मुद्धे नाहीत त्यामुळे ते महागाईवर बोलतात.९ वर्षात मोदी सरकारने जे विकासाचे काम केले ते यांना पचणारे नाही.मोदी द्वेषपोटी ही वक्तव्ये केली जातात.
एकाच पाटणकरच्या हातात अडीज वर्षे महाराष्ट्राला दावनीला का बांधले
दिनो मोरीयाचे लाड आदित्यने का केले?
कोणाला संपवण्यासाठी नाही मात्र उभे करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार आहे.
बारामतीच्या कारखान्यांना लागेल ती मदत दिली जाईल.फक्त जवळ येवून ती मागणी केली पाहिजे.