You are currently viewing दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेचा निकाल जाहीर…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेचा निकाल जाहीर…

माणगाव

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात १० वर्षापर्यंतच्या गटात दुर्वा जयसिंग घाडी (वेताळ बांबर्डे – कुडाळ) – प्रथम, शमिका सचिन चिपकर (कुडाळ – सिंधुदुर्ग) – द्वितीय, भक्ती संजय पवार (पनवेल), ११ ते २० वर्ष वयोगटात सोहन प्रविणकुमार अहिरे (साक्री – धुळे) – प्रथम, सई योगेश आनंदराव (जुन्नर – पुणे) – द्वितीय, भार्गवी विजय पाटील (पेण – रायगड) – तृतीय, खुल्या गटामध्ये शरद निळकंठ यादव (वाई – सातारा) – प्रथम, सुनिल मानसिंग यादव (कुसवडे – सातारा) – द्वितीय, अमृत प्रविण धामापूरकर (माळगाव बागायत, मालवण – सिंधुदुर्ग) – तृतीय, क्रमांक मिळवला.
या स्पर्धेमध्ये कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रसाद सुतार तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चे उपाध्यक्ष लिनेश धुरी, सरचिटणीस सुनील करडे, संपर्कप्रमुख युवराज राठोड यांनी व्हिडीओ एडिटिंग काम केले तसेच इतर सदस्यांनी नियोजन केले होते. अशोक प्रकाश मेस्त्री यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले. ही स्पर्धा ऑगस्ट मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीत विशारद अर्जुन शंकर पेंडूरकर यांनी काम बघितले. यशस्वी स्पर्धकांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =