You are currently viewing बँक ऑफ महाराष्ट्र शाखा फोंडाघाट, कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना सहकार्य होत नसलेबाबत तक्रार

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा फोंडाघाट, कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना सहकार्य होत नसलेबाबत तक्रार

उचित कार्यवाही न झाल्यास 26 जुन नंतर देणार उपोषणाची नोटीस – सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचा इशारा

फोंडाघाट

फोंडाघाट बैंक महाराष्ट्र शाखा फोंडाघाट येथे गेली ४५ वर्षे अजित नाडकर्णी यांचे कॅश क्रेडीट अकाउंट आहे. यापूर्वी सर्व सेवा व्यवस्थित असल्यामुळे शाखेविषयी केव्हांही तक्रार केली गेली नाही. परंतु आताच्या परिस्थितीत बँकेतील कर्मचारी वर्ग बॅक ग्राहकांना व्यवस्थित सहकार्य करत नाहीत.
बँकेतील कर्मचारी बेजबादारीने ग्राहकांशी बोलताना दिसून येतात. सर्व्हर डाऊन आहे. आपल्याला ई-मेल पाठविला आहे. खाते पुस्तकाची प्रिंट देत नाहीत, प्रिंट देणारे मशीनही वारंवार बंद असते, बँक बुकावरील बारकोडचे स्टिकर उपलब्ध नाहीत, बँक खातेचे मेसेजही येत नाहीत मेसेज संदर्भात विचारणा तसेच अत्यंत सावकाश (मंदगतिने) केली असता संध्याकाळी येईल, उद्या येईल अशी बेजबाबदार उत्तरे बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना दिली जात आहेत.
कामकाज चालू आहे. गरजेखातर पैसे काढायला गेलेल्या ग्राहकाला दोन तासापेक्षा जास्त वेळ लागत असल्याने ग्राहकाचे वेळेच्या बाबतीत फारच नुकसान होते. त्यामुळे बँक ग्राहकांमध्ये फारच असंतोष निर्माण झाला आहे. तसेच बँकेच्या ATM मशीन अधून-मधून आकस्मिकरित्या धोक्याचा सायरन वाजत असतो. त्यामुळे बाजारात नाहक घबराट निर्माण होते. याची बँकेत सुचना देऊनही काहीच कार्यवाही होत नाही. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा फोंडाघाट, ही गावातील सर्वात जुनी आणि राष्ट्रीयकृत बँक म्हणून नावारूपाला असलेली शाखा आजघडीला कर्मचारी वर्गामुळे बदनाम होत आहे. ही बाब खेदजनक असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले होते.
संगणक तांत्रिक बाबी, नेटवर्क या अत्यंत महत्वाच्या बाबी असूनही त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. अशावेळी कामकाज ठप्प होते. तरी या बाबतीत ग्राहक मेळावा घेऊन उचीत कार्यवाही होणेसाठी प्रयत्न करावेत अन्यथा २६ जुन  नंतर बँक ग्राहकांचा उद्रेक होऊन उपोषणाची नोटीस देण्यात येईल. तरी याबाबतीत उचीत कार्यवाही आणि मार्गदर्शन व्हावे अशा आशयाचे निवेदन माजी संचालक, सावंतवाडी अर्बन बँक फोंडाघाट तथा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी यापूर्वीही जानेवारीमध्ये प्रसिद्धीस दिले होते.
या निवेदनाची प्रत चिफ मॅनेजर (रिमोट प्रोसेसिंग सेंटर), बँक ऑफ महाराष्ट्र, गोवा रिजन, पहिला मजला, दत्तप्रसाद बिल्डिंग, एम. जी. रोड पणजी, गोवा यांनाही पाठवण्यात आली होती.

परंतु आजपर्यंत या कुठल्याच गोष्टींमध्ये बँकेच्या कामकाजात फरक दिसून आला नाही  जी परिस्थिती मागील काही महिन्यांमध्ये होती. तीच परिस्थिती अजूनही तशीच आहे. बँकेत कर्मचारी संख्या कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची, पेन्शन खाते असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तासान तास बँकेच्या कारभारात ग्राहकांचे,  व्यापारांचे व्यस्त होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी यावर तात्काळ उपायोजना न झाल्यास 26 जून रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 7 =