You are currently viewing बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट मध्ये फाऊंडेशन कोर्स

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट मध्ये फाऊंडेशन कोर्स

डी .जी बांदेकर ट्रस्टची स्थापना ; कलेची आवड असणाऱ्यांना अनोखी संधी

सावंतवाडी

डी.जी बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी आणि बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी या महाविद्यालयातर्फे त्यांच्या करिअरसाठी फाउंडेशन कोर्स यावर्षी प्रथमच सावंतवाडी सुरू करण्यात आलाय. या कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ आज आर्ट टीचर युनियन सिंधुदुर्ग प्रेसिडेंट रुपेश नेवगी, डी.जी बांदेकर ट्रस्टचे चेअरमन गोविंद बांदेकर, सचिव अनुराधा बांदेकर – परब यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या क्षेत्रात सीईटी परीक्षेविषयी पूर्व कल्पना व तयारी होण्याच्या दृष्टीने हा एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स उपयुक्त ठरेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कला क्षेत्राकडे वळून आपले आवडते करिअर निवडावे असे आवाहन डी.जी .बांदेकर ट्रस्टच्या सचिव अनुराधा बांदेकर यांनी केले आहे. तर डी.जी.बांदेकर या ट्रस्टची स्थापना करण्यात आली फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देण्यात आला आहे.कलेची आवड असणाऱ्या प्रत्येकाने या कॉलेजमध्ये आपले नाव नोंद करावे.१० वी तसेच १२ वी नंतर या कोर्स साठी प्रवेश घेता येणार आहे.या कोर्सच्या अधिक माहितीसाठी तुकाराम मोरजकर – ९४०५८३०२८८ व सिद्धेश नेरूरकर -९४२०२६०९०३ यांना संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा