You are currently viewing भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा

पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) आयोजित व्याख्यानमाला आणि संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलन संपन्न

( प्रतिनिधी मोहाडी प्र. डांगरी)

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमीत्ताने
संविधान व सामाजिक परिवर्तनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे यांनी अध्यक्षिय भाषणात बोलताना, “भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने व्याख्यानमाला, कवी संमेलन, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कौतुक सोहळा, संविधान उद्देशिका घराघरात अशा छान उपक्रमा बरोबर संविधानाची जनजागृती प्रसार आणि प्राचार , शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांनी स्वतःच्या मोहाडी प्र. डांगरी या आपल्या गावात राबवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक ! मुंबईला गेल्यावर लोकं गाव विसरतात पण शाम बैसाणे गावाला विसरले नाहीत. गावात छान उपक्रम त्यांनी घेतला आहे. सामजिक कार्य ते चांगले करीत आहेत. आज काल लोकं कौतुक करीत नाहीत पण बैसाणे यांनी चांगली भूमिका घेऊन गावात चांगले कार्य करणाऱ्या गावातील मान्यवरांचा आणि विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला आहे.” असे प्रतिपादन केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पांचपीर ट्रस्ट (मोहाडी), कार्यक्षेत्र भारत आयोजित व्याख्यानमाला बारकु काळू खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली आणि संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलन जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली व
शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
व्याख्यानमालिकेत वक्ते ॲड . नाना अहिरे ( प्रसिद्ध वकील आणि समाजसेवक) यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य , वक्ते पिंटू धनगर (माजी सरपंच) यांनी फुले शाहू आंबेडकर आणि मानवतावादी चळवळ,
आणि वक्ते बाळासाहेब शंकर बैसाणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान, या विषयानुसार मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले तर दुसऱ्या सत्रात संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलनामध्ये अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे ( सांगली )
सहभागी निमंत्रित कवी भटू जगदेव (भिवंडी), मास्टर राजरत्न राजगुरू ( बदलापूर ), अजय भामरे (अमळनेर), शरद धनगर (अमळनेर), शाम बैसाणे ( मोहाडी ), डॉ. सुशील बैसाणे ( मोहाडी), साक्षी खैरनार ( धुळे), पल्लवी चौधरी (मोहाडी ) आदी विषयानुरूप कविता सादर करून सामजिक प्रबोधन केले. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अहिराणी बोलीभाषेतील प्रसिध्द कवी शरद धनगर यांनी केले. मराठी भाषेसह अहिराणी बोली भाषेतील कविता , गजल , लोकगीते सादर करून उपस्थित गावकरी समाज बांधवांचे प्रबोधन केले.
कवी संमेलनाच्या निमंत्रीत कविंच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या बरोबरच दहावी आणि बारावी मध्ये गावात प्रथम, दुतिय आणि तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मुला – मुलींचा सन्मानपत्र , संविधान उद्देशिका व पुष्पगुच्छ देऊन कौतुक सोहळा संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रतन मोरे, महेश चौधरी, डॉ. सुशिल बैसाणे, (कार्याध्यक्ष पांचपीर ट्रस्ट मोहाडी) ,ॲड नाना अहिरे (सचिव पांचपीर ट्रस्ट मोहाडी), श्रावण अहिरे, तुषार पाटील , सुशीलाताई सोनवणे, विलास गुजर, सुनील पाटील, भाऊराव बैसाणे, हुकूमचंद गुजर, संतोष बिऱ्हाडे, पिंटू धनगर, नाना चौधरी, सागर आखाडे, जगदीश खैरनार, आशाबाई खैरनार, योगिता खैरनार, दिपाली खैरनार, योगेश बैसाणे, राहुल बैसाणे, बाळू बैसाणे, किशोर पवार, मोनू अहिरे, माया अहिरे, प्रकाश बैसाणे, रहीम खाटीक, राजू सोनवणे, आबा माळी, अमृत भोई, सागर बैसाणे, हिम्मत पाटील, पवन बैसाणे, अशोक धनगर, अरुण जैन, गोरख भोई, कैलास पवार, शालिक चित्ते , कैलास चित्ते , आनंदा हरी बैसाणे, मनोज चित्ते, युवराज माळी, हर्षवर्धन बैसाणे, आदी सह गावातील ग्रामस्थ होते.

______________________________
*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*

काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲

👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68

*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*

*जाहिरात 
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा