You are currently viewing नुकसानग्रस्त झाडांच्या नुकसानभरपाईचा वेगळा निकष लावणार- आ. दीपक केसरकर

नुकसानग्रस्त झाडांच्या नुकसानभरपाईचा वेगळा निकष लावणार- आ. दीपक केसरकर

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळाचा तडाका मोठ्या प्रमाणात बसला असून कोरोना आणि वादळ असे दुहेरी महासंकट कोकणावर ओढावले आहे. वादळात नुकसान झालेल्या झाडांच्या नुकसानभरपाईचा वेगळा निकष लावावा व झाडांनुसारच भरपाईची आकडेवारी द्यावी अशी मागणी आपण सरकारकडे करत असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. सिंधुदुर्गात विशेषतः समुद्रकिनारे आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात वीज वाहिनी दर वेळी पावसात तुटून नुकसान होते त्यासाठी ह्या दोन ठिकाणी अंडरग्राउंड वीज वाहिनी जोडणीकरण्यात यावी असा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − five =