You are currently viewing देवगड पडेल येथे कारच्या धडकेत सौंदाळे येथील युवक जागीच ठार

देवगड पडेल येथे कारच्या धडकेत सौंदाळे येथील युवक जागीच ठार

देवगड

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या अमेझ होंडा कारची समोरून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार वृषाल संतोष गुरव(२५) रा.सौंदाळे-गुरववाडी हा जागीच ठार झाला. हा अपघात आज दुपारी दीड वाजण्याचा सुमारास पडेल पेट्रोल पंपानजिक विजयदूर्ग-तळेरे मार्गावर घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौंदाळे-गुरववाडी येथील वृषाल गुरव हा युवक हा शनिवारी दुपारी मोटरसायकलने पडेल कॅन्टिन येथून सौंदाळे येथे त्याचा गावी जात होता. दरम्यान सांगली येथील कुटुंबीय कोकण पर्यटनासाठी अमेझ होंडा कारने निघाले ते गगनबावडा येथून विजयदूर्ग येथे येत होते. दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या वृषालच्या मोटरसायकलची अमेझ कारला समोरून जोरदार धडक बसली. या अपघातात मोटरसायकलस्वार वृषाल हा रस्त्यावर ढकलला जावून त्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून त्याचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची बातमी समजताच पडेल कॅन्टिन येथील नागरिक व व्यापारीवर्गाने अपघातस्थळी धाव घेतली. याबाबत विजयदूर्ग पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. विजयदूर्ग पोलिस स्टेशनचे अ‍ेपीआय भारतकुमार धरणे पोलिस उपनिरिक्षक भालेराव, पोलिस हवालदार अवधुत गुणीजन, बिर्जे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.घटनेची माहिती समजताच सौंदाळे येथील ग्रामस्थही घटनास्थळी व देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + seventeen =