You are currently viewing मिलाग्रिस हायस्कूल मध्ये ‘सेंट जॉन मेरी व्हियाना’ उत्साहात साजरा

मिलाग्रिस हायस्कूल मध्ये ‘सेंट जॉन मेरी व्हियाना’ उत्साहात साजरा

सावंतवाडी

मिलाग्रीस हायस्कूल मध्ये सेंट जॉन मेरी व्हियाना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या दिवसाचे महत्त्व प्रशालेच्या शिक्षिका सौ.लिवी परेरा यांनी कथन केले.त्यानंतर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल यांनी प्रार्थना केली.त्यानंतर सेंट जॉन मेरी व्हियाना यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपस्थित सर्व फादरांचा परिचय व सत्कार करण्यात आला.

मिलाग्रिस ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थिनी कु.डिलायला व पर्ल यांनी सुंदर गीत सादर केले.त्यानंतर सर्व उपस्थित फादरांनी केक कापला.ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले.फादर फिलिप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशालेच्या शिक्षिका सौ.लिवी परेरा यांनी केले.शेवटी टीचर सिंथिया डिसोझा यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा