You are currently viewing अत्याचारग्रस्त महिलांना सेवा पुरवण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर

अत्याचारग्रस्त महिलांना सेवा पुरवण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर

सिंधुदुर्गनगरी

हिंसाचारामुळे पीडित महिलांना खाजगी व सार्वजनिक ठिकाणी कुटुंब व समुदाय आणि कार्यस्थळांवर आधार देमे या उद्देशाने केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉपसेंटर ही शासकीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. कोणत्याही वयोगटातील पीडित महिला व बालिकांसाठी हे केंद्र काम करते. जिल्ह्यातही असे सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित असून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील टाईप चार, इमारत क्र. 6, रुम क्र.1, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, येथे हे केंद्र आहे.

            महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर, मानसशास्त्रीय आणि समुपदेशन सहाय्यासाठी अनेक तातडीच्या व आपत्कालीन सेवा पीडितेस एकाच छताखाली एकात्मिक सहाय्य देणे व समर्थन प्रदान करणे हा वन स्टॉप सेंटरचा मुळ हेतू आहे.

            सदर वन स्टॉप सेंटरमध्ये कोणत्याही वयोगटातील महिला, कोणत्याही मदतीसाठी पुढील क्रमांकावर वन संपर्क साधू शकतात. संपर्कासाठी क्रमांक सखी वस स्टॉप सेंटर, सिंधुदुर्ग – 02362- 229039 आणि जिल्हा माहिता व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग – 02362-228869 या प्रमाणे आहेत. तरी जिल्ह्यातील पीडित महिलांनी या सेंटरशी संपर्क साधावा व त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =