You are currently viewing बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर, बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर यादी उपलब्ध

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर, बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर यादी उपलब्ध

*बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर, बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर यादी उपलब्ध*

*शहर विभागातील ३५, पूर्व उपनगरांतील ६५ तर पश्चिम उपनगरातील १२६ इमारतींचा समावेश*

*रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘सी-१’ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या एकूण २२६ इमारतींची यादी महानगरपालिकेने जाहीर केली आहे. ही यादी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर उपलब्ध आहे. या २२६ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगरे विभागात ६५ तर पश्चिम उपनगरे विभागात १२६ इमारती यादीत समाविष्ट आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणार्‍या नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२६ इमारतींना, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ३५४ अन्वये ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित करण्यात आले आहे. या इमारतींची विभागनिहाय यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर —-> In Focus —-> Find out more—- > Quick Links —-> List of C-1 category Dilapidated Buildings 2023-24 या क्रमाने जावून पाहता येईल. या शीर्षकात नागरिक आपली इमारत अतिधोकादायक घोषित केलेल्या यादीमध्ये आहे किंवा नाही, याची खात्री करुन घेऊ शकतात.

या इमारतींमधील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित केल्यानंतर आणि निवासस्थाने रिक्त करण्याच्या सूचना केल्यानंतर देखील काही इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. अशा इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी तत्काळ ताबा सोडून सदर इमारत स्वतःहून निष्कासित करावी. उपकर प्राप्त इमारती व इतर धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारती बाबत संबंधित सक्षम प्राधिकरण यांनी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील आणि त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

*वास्तव्यास असणारी इमारत ढोबळ मानाने अतिधोकादायक झाली आहे, याची काही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. ती खालीलप्रमाणेः-*

१) इमारतीच्या आर. सी. सी. फ्रेम कॉलम, बीम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल होत असल्याचे आढळल्यास उदा. इमारतीचे कॉलम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा बीम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखे दिसून आल्यास.
२) इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसून आल्यास.
३) इमारतीच्या कॉलम मधील भेगा वाढत असल्याचे दिसून आल्यास.
४) इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसून आल्यास.
५) इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखा दिसल्यास.
६) इमारतीच्या आर. सी. सी. चेंबर्स (कॉलम, बीम्स) व विटांची भिंत यातील सांधा / भेगा वाढत असल्यास.
७) स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्यास.
८) इमारतीच्या गिलाव्यामध्ये (प्लास्टर) मोठ्या प्रमाणात भेगा वाढत असल्यास.
९) इमारतीच्या काही भागात विशिष्ट आवाज होत असल्यास.
१०) इमारतीच्या स्लॅब, बीम, कॉलमच्या भेगांमुळे लोखंडी शिगांचा आकार गंजल्यामुळे कमी झालेला असल्यास.

*अशा परिस्थितीत वास्तव्यास असणार्‍या रहिवाश्यांनी काय करावे*

१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ x ७ कार्यरत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६ / २२६९-४७२५ / २२६९-४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
२) सदर इमारत तातडीने रिकामी करावी.
३) आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाश्यांना सुद्धा सतर्क राहण्यास अवगत करावे.
४) तातडीने तज्ज्ञ आर.सी.सी. तांत्रिक सल्लागार यांना दाखवून प्रॉप्स / टेकू लावण्यासंदर्भात त्वरेने कार्यवाही करावी.

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने जागरुक राहणे, ही नागरिकांचाही जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्वजण जबाबदार नागरिक म्हणून आपापल्या परिसरातील इमारतीवर लक्ष ठेवून भविष्यातील दुर्घटना आपणांस टाळता येतील.

पावसाळ्याच्या कालावधीत इमारतीमध्ये पावसाचे पाणी मुरल्यामुळे इमारती / इमारतीचे भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढते. यामुळे धोकादायक इमारतीबाबत नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करण्याच्या दृष्टीने पुनश्चः आवाहन करण्यात येत आहे.

*‘सी-१’ प्रवर्गातील धोकादायक इमारतींची विभागनिहाय यादी-*

*ए विभाग*
१) मेहेर मॅन्शन, कूपरेज मार्ग, कुलाबा;
२) नोबल चेंबर, जन्मभूमी मार्ग, फोर्ट;
३) जे. के. सोमानी, ब्रिटिश हॉटेल लेन, फोर्ट.

*बी विभाग*
१) पारेख चेंबर, १२५-१२७, शेरीफ देवजी मार्ग;
२) पुरुषोत्तम इमारत, २०२-२०४, सॅम्यूएल स्ट्रिट आणि ५७-५९-६१, युसूफ मेहेरअली मार्ग;
३) २९६, सॅम्यूएल स्ट्रिट.

*सी विभाग*
१) एच. एम. पेटिट विडोज होम, इमारत क्रमांक २२५, सीएस क्रमांक २१७९, भुलेश्वर विभाग, जेएसएस मार्ग आणि बीजे मार्ग, ठाकूरद्वार;
२) शील भवन, इमारत क्रमांक १४, चौथा मरिन मार्ग, धोबी तलाव.

*डी विभाग*
१) अखिल भारत भवन कम्पाऊंड, सी. एस. क्रमांक ३१८, ताडदेव विभाग, बेलासिस मार्ग;
२) शालीमार एक्झीबिटर्स, ३३५, शालीमार हाऊस, एम.एस.अली मार्ग, ग्रँट मार्ग;
३) लोहाना महापरिषद भूवन इमारत, १०, चौथी खेतवाडी लेन, एस.व्ही.पी.मार्ग;
४) सी.एस. क्रमांक ३ ए/७३०, ताडदेव विभाग, १३६, सर्वोदय इस्टेट, सर्वोदय मिल कम्पाऊंड, उर्मी आंगन इमारतजवळ;
५) मेफेअर संकुलामधील दोन बांधकामे (गॅरेज), लीटल गिब्ज मार्ग, मलबार हिल्स;
६) ५१-सी, अमृतसरवाला पंजाबी वाळकेश्वर धर्मशाळा ट्रस्ट इमारत, बाणगंगा;
७) धनश्री इमारत, पी. जी. सोलंकी मार्ग, घास गल्ली;
८) भाटिया निवास, बाणगंगा छेद गल्ली.

*ई विभाग*
१) त्रिवेणी अपार्टमेंट, मकबा चाळीजवळ, एस. ब्रीज, भायखळा (पश्चिम);
२) बॉम्बे सोप फॅक्टरी, हुसैनी बाग, मदनपुरा.

*एफ/दक्षिण विभाग*
१) गणेश टॉकिज, साने गुरुजी मार्ग, लालबाग;
२) आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता गल्ली, दादर (पूर्व);
३) लालशा बाबा दर्गा मार्ग, तावरीपाडा, डॉ. एस. एस. राव मार्ग, लालबाग.

*जी/दक्षिण विभाग*
१) जानकी भवन, टेम्पररी ट्रान्झिट कॅम्प इमारत, हातिस्कर मार्ग, प्रभादेवी;
२) इंडिया रे हाऊस, डॉ. ए. बी. मार्ग, प्रभादेवी;
३) नीता इमारत, डॉ. ए. बी. मार्ग, वरळी;
४) मधुसुदन मील, शंकरराव नरम मार्गावरील उत्तर-पश्चिम दिशेकडील पहिली आणि दुसरी इमारत, सी. एस. क्रमांक ४४५, शंकरराव नरम मार्ग, लोअर परळ;
५) श्रीराम मिल येथील कम्पाऊंड भिंत, भूखंड क्रमांक, ५ए, सी. एस. क्रमांक १/२८९, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ;
६) नवोदय हाऊस, बी. जी. खेर मार्ग, वरळी;
७) तळमजल्यावरील बांधकाम, भूखंड क्रमांक. ७६, सी. एस. क्रमांक ९३५, बी. जी. खेर मार्ग, वरळी.

*जी/उत्तर विभाग*
१) खांडके इमारत क्रमांक ७ आणि ८, आर. के. वैद्य मार्ग, दादर (पश्चिम);
२) गिरीकुंज इमारत, एल. जे. मार्ग, माहिम;
३) व्हाईट हाऊस, सदनिका क्रमांक ५३४/ए४, टीपीएस III, सी. एस. क्रमांक १२०५, सोनावाला अग्यारी लेन, माहिम (पश्चिम);
४) जनार्दन अपार्टमेंट ए, बी, सी, डी, ई आणि जी विंग, सदनिका क्रमांक ८८६, शंकर घाणेकर मार्ग, दादर (पश्चिम);
५) श्री समर्थ व्यायाम मंदीर, पी. एल. काळे गुरुजी मार्ग, दादर (पश्चिम);
६) कलकत्ता कन्फेक्शनरी ऍण्ड शीतलादेवी इंडस्ट्रीअल इस्टेट, १४०, (तळमजला + १), शीतलादेवी मंदीर मार्ग, माहिम;
७) सिल्व्हर सँडस् को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सदनिका क्रमांक १८४, TPS III, वीर सावरकर मार्ग, माहिम.

*एच/पश्चिम विभाग*
१) लक्ष्मी भुवन, साई सदनजवळ, सी. टी. एस. क्रमांक ई/५५७ ऑफ व्हिलेज वांद्रे, ९ वा आणि ११ वा मार्ग जंक्शन, खार (पश्चिम);
२) वोरा इमारत, २ री हसनाबाद लेन, खार (पश्चिम);
३) रिविरिया को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., १५ वा रस्ता, नॉर्थ एव्ह्यून्यू मार्ग, सांताक्रूझ (पश्चिम);
४) लीला निवास, भूखंड क्रमांक ८३/सी५, मीरा बाग, १७ वा रस्ता, सांताक्रूझ (पश्चिम);
५) छेडा निवास, नॉर्थ एव्ह्यून्यू मार्ग, १८ वा रस्ता, सांताक्रूझ (पश्चिम);
६) अहमद बैग कॉटेज, ९१ सी, बझार मार्ग, वांद्रे (पश्चिम);
७) ख्वाजा इमारत, बझार मार्ग, वांद्रे (पश्चिम);
८) इमारत क्रमांक ३८७, दयाभाई अमरसी इमारत रहिवाशी संघ, हुसेन कंपाऊंड, जैन मंदिरसमोर, (बझार मार्ग), वांद्रे (पश्चिम);
९) साई आश्रम को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., साई आश्रम, पाली माला मार्ग, वांद्रे (पश्चिम);
१०) न्यू रंगारी चाळ, जरीमरी मंदिर मार्ग, वांद्रे (पश्चिम);
११) भूखंड क्रमांक ४२, चिंबई, वांद्रे (पश्चिम);
१२) बीच मनोर बंगलो, सीटीएस क्रमांक २७९ आणि सीटीएस क्रमांक २७८, वांद्रे सी डिव्हिजन, चिंबई गांव, चिंबई मार्ग, वांद्रे (पश्चिम);
१३) जितेंद्र इमारत, भूखंड क्रमांक २७६, मधू पार्कजवळ, १२ वा रस्ता, खार (पश्चिम);
१४) भूखंड क्रमांक २२, शेर्ले व्हिलेज, शेर्ले राजन मार्ग, वांद्रे (पश्चिम);
१५) लीली व्हिला, शेर्ले राजन मार्ग, वांद्रे (पश्चिम);
१६) बांगडीवाल चाळ, ६४, ६६, ६८, बांगडीवाल चाळ, भूखंड ए/५२५ आणि ए/५२८, बझार मार्ग, वांद्रे (पश्चिम);
१७) फोनसिका हाऊस, २९/ए, चॅपल मार्ग, सीटीएस क्रमांक बी/१६३, वांद्रे (पश्चिम);
१८) जमात खाना इमारत, हाजी नूरा लेन, बझार मार्ग, वांद्रे (पश्चिम);
१९) शांती भवन, हिल मार्ग, वांद्रे (पश्चिम);
२०) भूखंड क्रमांक ७७/ए, वरोडा मार्ग, वांद्रे (पश्चिम);
२१) अहिंसा भवन, अहिंसा मार्ग, खार (पश्चिम);
२२) भूखंड क्रमांक ४७, सेंट जोसेफ मार्ग, सांताक्रूझ (पश्चिम).

*एच पूर्व विभाग*
१) कालिका निवास, नेहरु मार्ग, सांताक्रूझ (पूर्व);
२) राठोड मॅन्शन, कलिना-कुर्ला मार्ग, कलिना, सांताक्रूझ (पूर्व);
३) हॅपी हाऊस क्रमांक ३, हॅपी हाऊस इमारत क्रमांक ३, वाकोला बाजारसमोर, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व);
४) युसेफ इमारत, पी. जे. नेहरु मार्ग, सांताक्रूझ (पूर्व);
५) एअरव्ह्यू ए विंग, झैयतून व्हिला इमारत, टि. एस. क्रमांक २४५९ ते २४६८, २४६९ए आणि २५२७बी ऑफ व्हिलेज कोळेकल्याण, नेहरु मार्ग, बृहन्मुंबई महानगरपालिका मंडईसमोर, सांताक्रूझ (पूर्व);
६) कृष्णकुंज अपार्टमेंट, गोळीबार, कब्रस्तानसमोर, सांताक्रूझ (पूर्व);
७) डिव्हाइन ग्रेस, योगा इन्स्टिट्यूटजवळ, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ (पूर्व);
८) ओम निवास, मार्ग क्रमांक ०२, प्रभात कॉलनी, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व);
९) सीताबाई रामदास, शिवाजी नगर मार्ग, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व);
१०) साईबाबा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., साईप्रसाद, चौथा रस्ता, प्रभात कॉलनी, टिपीएस १३७, सांताक्रूझ (पूर्व);
११) कैलास प्रभात को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सीएसटी मार्ग, कलिना, सांताक्रूझ (पूर्व);
१२) वाकोला रायझिंग सन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सेंट ऍन्थोनी मार्ग, विएना बेकरीजवळ, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व).

*के पूर्व विभाग*
१) मनोरमा सदन, डॉ. चरत सिंग कॉलनी, अंधेरी (पूर्व);
२) बंगला क्रमांक १२४, शहीद भगतसिंग को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., भूखंड क्रमांक १०४, ए. जी. जोडमार्ग, अंधेरी (पूर्व);
३) खुतबी मंझिल, सिगारेट फॅक्टरीसमोर, सहार मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व);
४) नगरवाला इमारत, सिगारेट फॅक्टरीसमोर, सहार मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व);
५) मेहरु मंझिल, चर्च मार्ग, मरोळ, अंधेरी (पूर्व);
६) ग्रीन बंगलो, पार्ले टिळक शाळेसमोर, सुभाष मार्ग, विलेपार्ले (पूर्व);
७) गंगा निवास, जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ, गुंफा मार्ग, जोगेश्वरी (पूर्व);
८) व्हनावटी बंगलो, एफ. पी. क्रमांक ४६९, आझाद मार्ग, विलेपार्ले (पूर्व);
९) एव्हरग्रीन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., ४०२, टिपीएसव्ही, एन. पी. ठक्कर मार्ग, विलेपार्ले (पूर्व);
१०) मणी भुवन, एम. जी. मार्ग, विलेपार्ले (पूर्व);
११) मोती माधव को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., राममंदिर मार्ग, विलेपार्ले (पूर्व);
१२) नारायणी भवन, सीटीएस क्रमांक ३१७, राजस्थान सोसायटी, व्हिलेज-कोंडीविटा, जे. बी. नगर, अंधेरी (पूर्व);
१३) लक्ष्मी निवास, हिंदूफ्रेन्ड सोसायटी मार्ग, जोगेश्वरी (पूर्व);
१४) राज भुवन, श्रद्धानंद मार्ग, विलेपार्ले (पूर्व);
१५) मनीषा अपार्टमेंट, सीटीएस क्रमांक १२४४/बी, मरोळ-मरोशी मार्ग, अंधेरी (पूर्व);
१६) अगरवाल भवन, भूखंड क्रमांक ४८, शेर-ए-पंजाब, अंधेरी (पूर्व);
१७) भोजराज भवन, भूखंड क्रमांक १२, हरदेवीबाई को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., गुंफा मार्ग, जोगेश्वरी (पूर्व);
१८) आनंद विहार, भूखंड क्रमांक ३९/४०, शेरे-ए-पंजाब सोसायटी, शेरे-ए-पंजाबसमोर, गुरुद्वारा, अंधेरी (पूर्व);
१९) स्मृती इमारत, हिंदूफ्रेन्ड सोसायटी मार्ग, सरस्वती बाग मनपा शाळेजवळ, जोगेश्वरी (पूर्व);

*के पश्चिम विभाग*
१) मातोश्री भानीबाई को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., भूखंड क्रमांक ८२, आरटीओ मार्गाजवळ, आंबिवली, लोखंडवाला मार्ग, अंधेरी (पश्चिम);
२) मोहम्मदी अपार्टमेंट को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., बेहराम बाग मार्ग, मासोळी बाजारामागे, जोगेश्वरी (पश्चिम);
३) सय्यद मंझिल, सहकार मार्ग, जोगेश्वरी (पश्चिम);
४) सातबाई ईस्सा अझीझ लोअर स्टेबल, सीटीएस क्रमांक १८७, १८७ (पार्ट), व्हिलेज बांडिवली, ई. ई. हाईट टॉवरसमोर, एस. व्ही. मार्ग, जोगेश्वरी (पश्चिम);
५) डिमेलो हाऊस, पानेरी शॉपिंग मॉलजवळ, अंधेरी गावठाण, एस. व्ही. मार्ग, अंधेरी (पश्चिम);
६) अ, विजय कॉलनी, सीटीएस क्रमांक ३८५सी, जुहू गल्ली, सी. डी. बर्फीवाला गल्ली, अंधेरी (पश्चिम);
७) मुन्शी भवन, जे. पी. मार्ग, अंधेरी (पश्चिम);
८) नंदभुवन इमारत, क्रीडा संकुलासमोर, जे. पी. मार्ग, अंधेरी (पश्चिम);
९) बिंद्रा निवास, क्रीडा संकुलासमोर, जे. पी. मार्ग, अंधेरी (पश्चिम);
१०) जेरु व्हिला, भूखंड क्रमांक २०, कृष्णा अपार्टमेंटजवळ, गुड शेफर्ड चर्चसमोर, चार बंगला, अंधेरी (पश्चिम);
११) गुणवंत व्हिला, उल्का पॅलेस, भूखंड क्रमांक ८, सीटीएस क्रमांक १२७८, सर्व्हे क्रमांक ८२ व्हिलेज वर्सोवा, सात बंगला;
१२) नाझनिन बंगला (शांती निवास), सात बंगला, वेसावे, अंधेरी (पश्चिम);
१३) पटेल बंगला, भूखंड क्रमांक २४, एन. एस. मार्ग क्रमांक १२, जयहिंद सोसायटी, जे.व्ही.पी.डी.;
१४) श्री. राहुल सुरी, भूखंड क्रमांक ६६, सीटीएस क्रमांक ३४३, एन. एस. मार्ग क्रमांक १२, विठ्ठल नगर, जुहू;
१५) मखारिया भवन, भूखंड क्रमांक १२, कपोल को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्रमांक ८४४, व्हि. एम. मार्ग, जे. व्ही. पी. डी. स्कीम, विलेपार्ले (पश्चिम);
१६) वसंतकुंज इमारत, बापूभाई वाशी मार्ग, विलेपार्ले (पश्चिम);
१७) सद् गुरु इमारत, बजाज मार्ग, विलेपार्ले (पश्चिम);
१८) वैनथेया को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., १९२-बी, एस.व्ही. मार्ग, इर्ला, विलेपार्ले (पश्चिम);
१९) शांती व्हिला, दादाभाई मार्ग आणि बजाज मार्ग जंक्शन, विलेपार्ले (पश्चिम);
२०) शांतिनिकेतन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., १४४/ए, एस. व्ही. मार्ग, विलेपार्ले (पश्चिम);
२१) अनुशील निकेतन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., १४४, एस. व्ही. मार्ग, विलेपार्ले (पश्चिम);
२२) प्रभूदास इमारत ९-ए, ९-बी, सेंट झेवियर्स, विलेपार्ले (पश्चिम).

*पी दक्षिण विभाग*
१) गजानन इमारत क्रमांक ९, सीटीएस क्रमांक ३४, व्हिलेज पहाडी एक्सार, जवाहर नगर, गोरेगांव (पश्चिम);
२) मणीभुवन इमारत, एस. व्ही. मार्ग, गोरेगांव (पश्चिम);
३) आशियाना को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., अपर गोविंद नगर, मालाड (पूर्व);
४) छाया इमारत, भूखंड क्रमांक २५२, जवाहर नगर, गोरेगांव (पश्चिम);
५) आशीष इमारत, एस. व्ही. मार्ग, विजय सेल्स, गोरेगांव (पश्चिम).

*पी उत्तर विभाग*
१) देव निवास, मामलेतदारवाडी, छेद मार्ग क्रमांक ३, मालाड (पश्चिम);
२) पोरोकॉल हाऊस ऑफ अवर लेडी ऑफ सी चर्च, मढ आयलँड, मढ मार्ग, मालाड (पश्चिम);
३) न्यू ग्रीन अपार्टमेंट, बी विंग, तुरेल पाखाडी मार्ग, मालाड (पश्चिम);
४) खेतान इस्टेट, रामचंद्र लेन, मालाड (पश्चिम);
५) साई कुंज, रामचंद्र लेन, मालाड (पश्चिम);
६) महाप्रभू इमारत, सीटीएस क्रमांक ७३४, ओर्लेम, मार्वे मार्ग, मालाड (पश्चिम);
७) मालाड गंगा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., एफ आणि जी विंग, ६५, रिलिफ मार्ग, मिठ चौकी, मालाड (पश्चिम);
८) श्री सोनाली विहार, भूखंड क्रमांक १३, लिबर्टी उद्यान मार्ग क्रमांक १, दुर्गा लेन, मालाड (पश्चिम);
९) स्वालंबन, सीटीएस क्रमांक ७८५/१ ते ७८५/६, मामलेतदार वाडी, ६ छेद मार्ग, मालाड (पश्चिम);
१०) उज्ज्वल नंदादीप को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., (०४ इमारती), ऑफ लिंक मार्ग, एव्हरशाईन नगर, मालाड (पश्चिम);
११) भारत निवास, लिबर्टी उद्यान, मालाड (पश्चिम);
१२) वासंती भुवन, स्टेशन मार्ग, हनुमान मंदीराजवळ, मालाड (पश्चिम);
१३) नाथनलाल इस्टेट, स्टेशनच्या समोर, मालाड (पश्चिम);
१४) श्री संतोषी नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., नर्सिंग लेन, वर्धमान नगर जवळ, मालाड (पश्चिम);
१५) पुष्पा पार्क, जी भूखंड (तळमजला+२), एस. के. पाटील रुग्णालयजवळ, दफ्तरी मार्ग, मालाड (पूर्व);
१६) मिस्त्री भुवन, आर. एस. मार्ग, रहेजा टिपको समोर, मालाड (पूर्व);
१७) भूपेंद्र निवास, जितेंद्र मार्ग, मालाड (पूर्व);
१८) मेटल हाऊस, सर्व्हे क्रमांक १५४, हिस्सा क्रमांक १ (पार्ट), सीटीएस क्रमांक ४७, जितेंद्र मार्ग, मालाड (पूर्व);
१९) हवा हिरा महल, दफ्तरी मार्ग, मालाड (पूर्व);
२०) गुलिस्थान इमारत, जयाप्रभा बार जवळ, दफ्तरी मार्ग, मालाड (पूर्व);
२१) एमएमटीसी अपार्टमेंट, लोअर गोविंद नगर, मालाड (पूर्व);
२२) नूर मंझील, भूखंड क्रमांक ४४, पुष्पा पार्क मार्ग क्रमांक ४, मालाड (पूर्व);
२३) केशरदेव हाऊस, सीटीएस क्रमांक ५४६ए, व्हिलेज मालाड (पूर्व), राणीसती मार्ग, मालाड (पूर्व);
२४) सहकार भुवन, सीटीएस क्रमांक २४९, २४९/१ ते १३ खंडवाला मार्ग, मालाड (पूर्व).

*आर दक्षिण विभाग*
१) पॅराडाईज इमारत, शांतीलाल मोदी मार्ग, कांदिवली (पश्चिम);
२) मीना हाऊस, पारेख गल्ली, कांदिवली (पश्चिम);
३) कुंदी दीप, इराणीवाडी मार्ग क्रमांक ३, कांदिवली (पश्चिम);
४) श्री शिवम, गोरसवाडी मार्ग, कांदिवली (पश्चिम);
५) विजय महल, कस्तुरबा मार्ग, कांदिवली (पश्चिम);

*आर मध्य विभाग*
१) मुलतानी चाळ स्ट्रक्चर क्रमांक ३९०, एफ.पी. क्रमांक ५८, टीपीएस-III, एस.व्ही. मार्ग, उमेद आश्रम, बोरिवली (पश्चिम);
२) मुलतानी चाळ स्ट्रक्चर क्रमांक ३९१, एफ. पी. क्रमांक ५८, टीपीएस-III, एस.व्ही. मार्ग, उमेद आश्रम, बोरिवली (पश्चिम);
३) मुलतानी चाळ स्ट्रक्चर क्रमांक ३९२, एफ. पी. क्रमांक ५८, टीपीएस-III, एस.व्ही. मार्ग, उमेद आश्रम, बोरिवली (पश्चिम);
४) मुलतानी चाळ स्ट्रक्चर क्रमांक ३९३, एफ.पी. क्रमांक ५८, टीपीएस-III, एस.व्ही. मार्ग, उमेद आश्रम, बोरिवली (पश्चिम);
५) ज्ञाननगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., श्री वर्धमान स्थानकवाडी जैन संघ, एल. टी. मार्ग, डायमंड टॉकीजजवळ, बोरिवली (पश्चिम);
६) त्रिलोक कृपा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., कार्टर मार्ग क्रमांक ४, बोरिवली (पूर्व);
७) गंगा-जमुना को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., रिटा पॅलेस इमारतीजवळ, लोकमान्य टिळक मार्ग, महाराष्ट्र नगर, बोरिवली (पश्चिम);
८) राम नगर ट्रस्ट १, इमारत १, रामनगर मार्ग, एस. व्ही. मार्ग, बोरिवली (पश्चिम);
९) राम नगर ट्रस्ट १, इमारत २, रामनगर मार्ग, एस. व्ही. मार्ग, बोरिवली (पश्चिम);
१०) सत्यभामा निवास इमारत क्रमांक ०२, कस्तुरबा मार्ग क्रमांक ०१, कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या मागे, बोरिवली (पूर्व);
११) सत्यभामा निवास इमारत क्रमांक ०१, कस्तुरबा मार्ग क्रमांक ०१, कस्तुरबा पोलिस स्टेशनच्या मागे, बोरिवली (पूर्व);
१२) गणेश भुवन, एफ.पी. क्रमांक ७, ठक्कर मॉलच्या समोर, एस. व्ही. मार्ग, बोरिवली (पश्चिम);
१३) लक्ष्मी भुवन, सदनिका क्रमांक ६, ठक्कर मॉल, एस. व्ही. मार्ग, बोरिवली (पूर्व);
१४) संभव दर्शन पुरुषोत्तम पार्क सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादीत, कार्टर मार्ग क्रमांक ४, बोरिवली (पूर्व);
१५) जयगोपाल कृष्णा सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादीत, कार्टर मार्ग क्रमांक ०२, बोरिवली (पूर्व);
१६) बोरिवली माधवबाग, सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादीत, चाळ अ, जांबळी गल्ली, एस. व्ही मार्ग, बोरिवली (पश्चिम).

*आर उत्तर विभाग*
१) श्रीशांती निकेतन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सी. एस. मार्ग क्रमांक ३, सी. एस. कॉम्प्लेक्स, दहिसर (पूर्व).

*एम पश्चिम विभाग*
१) भूखंड क्रमांक ३५, सिधी इमीग्रेंटस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., चेंबूर;
२) संदू वाडी, ७ रस्ता, आरएलबी लॅब इमारत आणि एनएसी इ-९३ इमारत, चेंबूर;
३) यदुकुल इमारत, पोस्टल कॉलनी मार्ग, भूखंड क्रमांक २४ चेंबूर;
४) कमल सदन, भूखंड क्रमांक ८, सिंधी सोसायटी, एकविरा मार्ग, एसटी मार्ग, चेंबूर;
५) श्रमसाफल्य इमारत, ७१-ब, एन. जी. आचार्य मार्ग, चेंबूर;
६) विश्रामबाग, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर;
७) भूखंड क्रमांक २७८, संत अँथनी मार्ग, चेंबूर;
८) सिंघवी अपार्टमेंट (सुप्रीम हाऊस), रस्ता क्रमांक. १६;
९) काशी निकेतन, एन. जी. आचार्य, मार्ग;
१०) अंजना गृहनिर्माण हाउसिंग सोसायटी लिमिटेड पेस्तम सागर, मार्ग क्रमांक सह, चेंबूर (पश्चिम).

*एल विभाग*
१) कंथारिया स्टेबल, जरीमरी अंधेरी कुर्ला मार्ग;
२) कुलदीप सिल्क मिल एमटीएनएल मार्ग साकीनाका;
३) जॉन्सन अँड जॉन्सनख् बच्चू गॅरेजजवळ, साकीनाका मुंबई;
४) जानकी निवास, बैल बाजार, कुर्ला पश्चिम;
५) रेमेडीअस हाऊस, एलबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम);
६) जयराज भुवन इमारत, न्यू मेल मार्ग कुर्ला (पश्चिम);
७) साखरवाला इमारत, कुर्ला कोर्ट;
८) स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी कुर्ला पूर्व;
९) अजय निकेतन, चुनाभट्टी कुर्ला (पूर्व);
१०) न्यू हेवन स्टील बॉल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, बीएमसी मेंटेनन्स चौकजवळ, साकी विहार मार्ग, साकीनाका;
११) सामी इमारत, पाईप मार्ग, कुर्ला पश्चिम;
१२) अंबिका इमारत, केळुस्कर मार्ग जंक्शन;
१३) अंबिका दर्शन, ११४ आयबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम).

*एन विभाग*
१) काकूबाई रंगवाला चाळ, संदीप हॉटेल पाठीमागे, स्टेशन मार्ग, घाटकोपर (पश्चिम);
२) काकूबाई रंगवाला चाळ, संदीप हॉटेल पाठीमागे, स्टेशन मार्ग, घाटकोपर (पश्चिम);
३) शांता भुवन, गंगावाडी, एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम);
४) दिलीप कुंज, जीवदया मार्ग, घाटकोपर (पश्चिम);
५) इमारत क्रमांक. १, नारायण नगर, एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम);
६) जंजिरा चाळ, राजावाडी मार्ग क्रमांक. १, घाटकोपर (पश्चिम)
७) अमृतकुंज, एमजी मार्ग, घाटकोपर (पूर्व);
८) गोपाल भुवन, एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम),
९) वनमानी भवन, विराज अपार्टमेंट, नवरोजी मार्ग, घाटकोपर (पश्चिम);
१०) गिरीधर नगर इमारत, जिवदया मार्ग, घाटकोपर (पश्चिम);
११) कृष्णानाल्यम गृहनिर्माण हाउसिंग सोसायटी लिमिटेड, भूखंड क्रमांक. १७, वर्षा वल्लभ बाग मार्ग, गारोडिया नगर, घाटकोपर (पूर्व);
१२) मिलन शॉपिंग सेंटर, नारायणदास मोरारदासजी इमारत, मुख्य शॉपिंग सेंटर, एमजी मार्ग, घाटकोपर (पश्चिम).

*एस विभाग*
१) गीतांजली इमारत, ‘ए’ विंग, विलेज मार्ग, भांडूप (पश्चिम);
२) गीतांजली इमारत ‘बी’ विंग, विलेज मार्ग, भांडूप (पश्चिम);
३) कमल विहार, कमल विहार मार्ग, भांडुप (पश्चिम);
४) सरोज भवन, ओल्ड कोर्ट मार्ग, स्टेशन मार्ग, विक्रोळी;
५) नरेंद्र भवन, ओल्ड कोर्ट मार्ग, स्टेशन मार्ग, विक्रोळी (पश्चिम);
६) सरस्वती सदन, भूखंड क्रमांक ५४, सीटीएस क्रमांक ७५० कांजूरगाव, अशोक नगर मार्ग, दातार कॉलनी, कांजुरमार्ग (पूर्व);
७) सुजल अपार्टमेंट क्रमांक ४ को-ऑप. हौ. सोसायटी लि., भूखंड क्रमांक ८७, दातार कॉलनी, भांडुप (पूर्व);

*टी विभाग*

१) मोनानी सदन, मोनानी सदन (ओल्ड भुजबळ निवास), विंग ‘ए’ आणि ‘बी’, भारत बँकेच्या समोर, जे. एन. मार्ग, मुलुंड (पश्चिम);
२) श्याम भुवन, श्याम भुवन गोखले मार्ग, मुलुंड (पूर्व);
३) सोट्टा भुवन आणि जलाराम भुवन, एल.टी. मार्ग, रेल्वे स्टेशनसमोर, मुलुंड (पूर्व);
४) अभिजित इमारत, बी. के. मार्ग, मुलुंड (पूर्व);
५) हरि निवास, म्हात्रे नगर, मिठागर मार्ग, मुलुंड (पूर्व);
६) कृष्णा निवास, म्हात्रे नगर, मिठागर मार्ग, मुलुंड (पूर्व);
७) लक्ष्मी-छाया, लक्ष्मी-छाया इमारत, नवघर गल्ली क्रमांक १, नवघर मार्ग, मुलुंड (पूर्व);
८) विजय अपार्टमेंट, नवघर गल्ली क्रमांक १ समोर, मुलुंड (पूर्व);
९) रमानी भुवन, आर. आर. टी. मार्ग, मुलुंड (पश्चिम);
१०) ब्रह्मज्योती, ब्रह्मज्योती इमारत ‘बी’ (मिरानी नगर), गणेश गावडे मार्ग, मुलुंड (पश्चिम);
११) महामाया, महामाया इमारत, गणेश गावडे मार्ग, मुलुंड (पश्चिम);
१२) रमा भुवन ‘ए’ विंग, एन.एस.बी. मार्ग, मुलुंड (पश्चिम);
१३) अडेनवाला, अडेनवाला को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., भूखंड क्रमांक ५१६ए, सीटीएस क्रमांक ९४१ १ ते ९, पी. के. मार्ग आणि एन.एस. मार्ग जंक्शन, मुलुंड (पश्चिम);
१४) वल्लभ भुवन, वालाजी लढ्ढा मार्ग, मुलुंड (पश्चिम);
१५) अनुसया इमारत, आर.@ एच. बी. रस्त्याच्या समोर, मुलुंड (पश्चिम);
१६) नीलम इमारत, आर. एच. बी. रस्ता आणि गणेश गावडे मार्ग, मुलुंड (पश्चिम);
१७) एकविरा सदन, मुलुंड (पश्चिम), एन. एस. रस्ता, मुलुंड (पश्चिम);
१८) ओल्ड रेशम हाऊस, सी. टी. एस. क्रमांक ८६७, एस.एन. मार्ग, मुलुंड (पश्चिम);
१९) शांती भुवन इमारत, मुलुंड रेल्वे स्टेशनसमोर, एन.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम);
२०) पुष्पा निवास, ए आणि बी विंग, एम.जी. मार्ग आणि आर. पी. रस्ता जंक्शन, मुलुंड (पश्चिम);
२१) गिरीराज ब्रिजवासी भुवन, बी इमारत, सी.टी.एस. क्रमांक १३४२बी, डॉ. गजानन पुरंदरे मार्ग, वालाजी लढ्ढा मार्ग, मुलुंड (पश्चिम);
२२) महादेव निवास, जंक्शन ऑफ आर. एच. बी. रस्ता आणि एस. एल. रस्ता जंक्शन, मुलुंड (पश्चिम);
२३) बाल स्मृती इमारत, मुरार मार्ग, मुलुंड (पश्चिम)

प्रतिक्रिया व्यक्त करा