You are currently viewing श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, माठेवाडा सावंतवाडी येथे होणार सत्संग आनंद सोहळा*

श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, माठेवाडा सावंतवाडी येथे होणार सत्संग आनंद सोहळा*

*श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, माठेवाडा सावंतवाडी येथे होणार सत्संग आनंद सोहळा*

*श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांची लाभणार मंगल उपस्थिती*

सावंतवाडी:(प्रतिनिधी)
श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट माठेवाडा, सावंतवाडी (आत्मेश्वर मंदिर नजिक) येथे रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सद्गुरू श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज, मठाधिपती श्रीक्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, जिल्हा कोल्हापूर यांच्या मंगल उपस्थितीत सत्संग आनंद सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
याप्रसंगी सकाळी 5.30 वा. काकड आरती, 9.00 वा. सकाळचे सांप्रदायिक भजन, 11.00 वा. दुपारचे सांप्रदायिक भजन, संध्या. 5.00 वा. कार्यक्रम स्थळी दिंडीच्या गजरात श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचे आगमन व पाद्यपूजा, सायं. 6.00 वा. रात्रीचे सांप्रदायिक भजन, 7.00 वा. दासबोध वाचन, रात्री 8.00 वा. स्वामींच्या अमृतवाणीतून आध्यात्मिक प्रवचन होणार असून रा. 9.00 वा. आरती, दर्शन सोहळा आणि सर्व भाविक भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी स्वामीभक्त भाविकांनी स्वामी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती अध्यक्ष श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट माठेवाडा, यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 9421237568/ 9420408853/ 9422871778.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =