एस.व्ही.हांडे; कायदेविषयक जनजागृती व महिलांचे सशक्तीकरण विषयावर मार्गदर्शन…
सावंतवाडी :
यांत्रिकरण इंटरनेट युगात संवाद हरवला आहे. यामुळे घरोघरी संवाद हरवत असताना मनातील संवादाची गरज निर्माण झाली आहे. महिलांनी एकमेकांशी संवाद साधून ताणतणावाच्या गोष्टीवर फुंकर घातल्यास नक्कीच महिलांचे जीवनमान उंचावले, असा विश्वास जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.व्ही.हांडे यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राष्ट्रीय महिला आयोग तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सावंतवाडी वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात कायदेविषयक जनजागृती महिलांचे सशक्तीकरण या विषयावर जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे बोलत होते.