You are currently viewing पी.एफ आणि वर्षातून किमान दोन वेळा हेल्थ कॅम्प लावा

पी.एफ आणि वर्षातून किमान दोन वेळा हेल्थ कॅम्प लावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषध कर्मचारी आयोजित कर्मचारी मेळावा

कणकवली

सिंधुदुर्गातील औषध कामगारांच्या मेळाव्याच्या निमित्ताने २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे औषध व्यवसायात सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आले.या प्रसंगी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.कोरोनाच्या काळात कसलाही विचार न करता जी सेवा दिलीय त्या सर्वांचेच आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्टचे माजी अध्यक्ष नंदू उबाळे,जिल्हा केमिस्टचे सचिव संजय सावंत,खजिनदार विवेक आपटे, माजी अध्यक्ष मनोहर कामत,राजू केसरकर,अभय नाईक,काशिनाथ तारी,मकरंद घळसासी,वर्दे,रत्नागिरी जिल्हा कर्मचारी उपाध्यक्ष विजय गुरव तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष समीर ठाकुर हे उपस्थित होते.कार्यक्रमदरम्यान वरील सर्वच प्रमुख पाहुण्यांजवळ कर्मचारी संघटनेने पी.एफ आणि वर्षातून किमान दोन वेळा हेल्थ कॅम्प लावावा अशी विनंती केली आहे.वरील सर्वांनी कर्मचारी जगला पाहिजे,पी.एफ सारख्या योजनांचा लाभ कसा घ्यावा या या संदर्भात मार्गदर्शन केलं.या कार्यक्रमदरम्यान देवगड येथील कुलकर्णी हेल्थ केअर सेंटरचे मालक सुनिल कुलकर्णी यांनी आपल्या मेडिकल मध्ये २० वर्षे ज्या कर्मचाऱयांनी सेवा केलीय त्या ४ कर्मचाऱयांना प्रत्येकी २१ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविले. हा औषध कर्मचारी मेळावा आण सत्कार सोहळा पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटनेचे सर्व संचालक तसेच सर्वं तालुकाध्यक्ष,जेष्ठ कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केलं तर आभार अरुण घाडी यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 5 =