You are currently viewing “आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!” – बालमित्रांसाठी आँनलाईन एक भन्नाट स्पर्धा

“आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!” – बालमित्रांसाठी आँनलाईन एक भन्नाट स्पर्धा

 

“हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे…” निसर्गाचे सुंदर वर्णन असलेली बालकवींची ही कविता बालमित्रांनो तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल. पण मोठ्यांच्या निष्काळजीपणामुळे ह्या सुंदर निसर्गाचा ऱ्हास हाऊ लागला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, ग्लोबल वॉर्मिंगसारखी अनेक संकटे आपल्यावर ओढवली. मोठी माणसं चुकीची वागली की आपण बच्चेकंपनीलाच त्यांची चूक लक्षात आणून द्यावी लागते.

 

लोकसत्ता म्हणूनच तुमच्यासाठी एक भन्नाट स्पर्धा घेऊन आले आहेत. लोकसत्ता डॉट कॉम आणि ‘युनिसेफ’ या जागतिक संघटनेने एकत्र येऊन ६ ते १४ वर्ष वयोगटातील तुम्हा बाल शिलेदारांसाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. डोण्ट वरी! तुम्ही घरात बसून या स्पर्धेत भाग घेऊ शकता. आहे की नाही गंम्मत! या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवू शकणार आहात.

 

“आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!” असे या पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या स्पर्धेचं नाव आहे. चिमुकल्यांनो तुम्ही यासाठी हव्या त्या माध्यमातून व्यक्त होऊ शकता. चित्र काढा, व्हिडिओ तयार करा, क्राफ्टिंग करा, स्लोगन लिहा… असं काहीही भन्नाट करू शकता. पण, त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश जायला हवा… म्हणूनच तर तुम्हाला “आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!” म्हटलं आहे.

 

*वयोगट कोणता?*

या स्पर्धेत ६ ते १४ वयोगटातील कोणताही मुलगा/मुलगी भाग घेऊ शकतात.

 

*कुठे पाठवायचं ?*

तुमचं चित्र, वरील संदेश देणारा व्हिडिओ, क्राफ्टिंगचा व्हिडिओ, स्लोगन यापैकी जे काही तुम्ही तयार कराल ते onlineloksatta@gmail.com या इमेल अ‍ॅड्रेसवर पाठवायची आहे. आपली कलाकृती पाठवताना इमेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पालकांचा मोबाईल नंबर आणि इमेल अ‍ॅड्रेस अवश्य लिहा.

 

*मुदत कधीपर्यंत?*

तुमची कलाकृती लोकसत्ता ला १७ नोव्हेंबर २०२० पर्यंत कधीही पाठवू शकता.

 

*स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना काय मिळणार बक्षीस?*

येणाऱ्या सर्व कलाकृतींतून लोकसत्ता आणि युनिसेफचे जुरी मेंबर पाच विजेते निवडतील. त्यांना उत्कृष्टतेसाठी खास डिजिटल प्रमाणपत्र दिलं जाईल. शिवाय पहिल्या शंभर उत्कृष्ट कलाकृतींसाठीही सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. याशिवाय या उत्कृष्ट आणि निवड झालेल्या कलाकृतींना लोकसत्ता डॉट कॉमच्या सोशल मीडियावर आणि युनिसेफद्वारे प्रसिद्धी दिली जाईल.

 

तर मग… बालमित्रांनो वाट कसली पाहताय चला… चालवा डोकं… तुमच्या छोट्याशा डोक्यामधून येऊ द्या भन्नाट आयडियांचा खजिना बाहेर… द्या जगाला संदेश…

लोकसत्ता वाट पाहतोय, तुमच्या ईमेलची…

This Post Has 3 Comments

  1. विद्या वाडदेकर

    माननीय स्पर्धा संयोजक,
    स. न.
    आपण “आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!” स्पर्धा जाहीर केली होती. सहभागी होण्यासाठी मुदत १७ नोव्हेंबर २०२० पर्यंत होती.

    मुले लहान असल्याने निकालाची आतुरतेने वाट पहात आहे. तरी आपण निकाल साधारण केव्हा जाहीर होईल ते कळविल्यास चांगले होईल.
    आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद!

  2. vibhavari palav

    या संदर्भात काही update मिळताच ते बातमी स्वरूपात दिले जातील अजून काही तसे जाहीर झाले नाही त्या related बातमी आमच्या पर्यंत आली नाही.

  3. विद्या वाडदेकर

    माननीय स्पर्धा संयोजक,
    स. न.
    आपण “आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!” स्पर्धा जाहीर केली होती. सहभागी होण्यासाठी मुदत १७ नोव्हेंबर २०२० पर्यंत होती.
    २३ फेब्रुवारी २०२१ रोजी आपण या स्पर्धेचा निकालही जाहीर केलात. परंतु या १०० स्पर्धकांची चित्रे आपण आपल्या संकेत स्थळावर कधी उपलब्ध करणार?

    आपण दुवा कळविल्यास आभारी राहू.
    आपल्या उत्तम कार्यासाठी आणि तत्पर सहकार्यासाठी धन्यवाद!

vibhavari palav साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.