You are currently viewing सावंतवाडी पालिकेचा पत्रकार कक्ष अद्ययावत करा – पत्रकारांची मागणी

सावंतवाडी पालिकेचा पत्रकार कक्ष अद्ययावत करा – पत्रकारांची मागणी

मुख्याधिकारी सागर सोळंके यांचे सकारात्मक आश्वासन…

सावंतवाडी

येथील पालिकेच्या माध्यमातून शहरातील पत्रकारांसाठी देण्यात आलेला पत्रकार कक्ष अद्ययावत करण्यात यावा, अशी मागणी आज सावंतवाडीतील पत्रकारांच्या वतीने मुख्याधिकारी सागर सोळंके यांच्याकडे करण्यात आली. यावेळी येत्या चार दिवसात या पत्रकार कक्षाची पाहणी करून कक्ष अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे, आश्वासन श्री सोळंके यांनी दिले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सचिव मयुर चराठकर, सहसचिव विनायक गांवस, उपाध्यक्ष दीपक गांवकर, प्रसन्न राणे, सदस्य नरेंद्र देशपांडे, प्रेस क्लबचे रूपेश हिराप आदी उपस्थित होते. सावंतवाडी नगर परिषदेने सावंतवाडी तालुक्यातील आणि शहरातील पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष दिलेला आहे. या पत्रकार कक्षाची दुरावस्था झाली असून, याबाबतचे लेखी निवेदन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते मुख्याधिकारी सागर सोळंके यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये असे, नमूद करण्यात आले आहे की, या पत्रकार कक्षातील फर्निचर तसेच अन्य साहित्य नसल्यामुळे पत्रकार कक्षात बसता येत नाही. तरी पत्रकार कक्षाची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि फर्निचरसह वातानुकूलित पत्रकार कक्ष तयार करण्यात यावा.

इंदिरा गांधी व्यापारी संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर हा पत्रकार कक्ष आहे. पत्रकार कक्षाच्या समोरच बॅरिस्टर नाथ. पै. सभागृह आहे यापूर्वी पत्रकार कक्षाच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे मुख्याधिकारी साळुंखे यांनी स्वतः लक्ष घालून पत्रकार कक्ष अद्यावत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी मुख्याधिकारी सागर सोळंके यांनी येत्या ४ दिवसांत स्वतः या पत्रकार कक्षाची पहाणी करून पत्रकार कक्ष सुस्थितीत केला जाईल अस आश्वासन त्यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 9 =