You are currently viewing निवेदने आणि आश्र्वासनांची परिस्थिती जैसे थे….

निवेदने आणि आश्र्वासनांची परिस्थिती जैसे थे….

आमदार वैभव नाईकांना मनसेचा टोला.

कुणाल किनळेकर –  जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग

सर्वच सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केलेल्या मागणीमुळे तसेच राज्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम यांना परवानगी जवळपास सर्वच राज्यांनी दिलेली आहे. यश आले की कुडाळ मालवणचे आमदार लगेच फोटो काढून श्रेयासाठी धावतात आणि आपली पाठ थोपवून घेतात.
त्याच प्रमाणे नुसत्याच दिलेल्या निवेदनांचा पाठपुरावा करण्याआधी श्रेय घेणाऱ्या आमदारांनी घरबांधणी परवानगीचे अधीकार ग्रामपंचायतीला पुन्हा दिल्याचे जाहीर करून आपले व आपल्या मंत्र्यांनचे अभिनंदन करुन घेतले पण प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे .
तसेच गेली ७ ते ८ वर्षे बांधून पूर्ण झालेले कुडाळ मधील महिला रुग्णालय आमदार म्हणतात चार महिन्यांत सुरू करणार खासदार म्हणतात दोन महिन्यांत सुरू करणार सांगुन परिस्थिती जैसे थे.
मतदारसंघातील खड्यात गेलेल्या रस्त्यासाठी लाखो करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला जाहीर केले. मंत्र्यांबरोबर फोटो काढून घेतला निवेदन दिले अभिनंदन करून झाले परिस्थिती जैसे थे च.
मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला समज दिल्याचे भासवून पावशी येथे पाहणी स्टंट करून परिस्थिती जैसे थे च.
मालवण मधील मच्छिमारांनचे प्रश्र्न थेट समुद्रात जाऊन सोडविण्याचा स्टंट केला, यांच्या पालकमंत्र्यांनी थेट ऐल ए डी मच्छिमारांच्या कार्यक्रमास उपस्थिती लावून सत्कार करुन घेतला. आमच्या पारंपरिक मच्छीमार बांधवांनची सद्य परिस्थितीत जैसे थे च.
आमदार साहेब खुप गेल्या सहा वर्षांत खुप झाली निवेदने,स्टंटबाजी, फोटोग्राफी आणि सत्कार तसेच अभिनंदनंदनाचे सोहळे जरा दिलेल्या निवेदनांचा पाठपुरावा केला तर आम्हा मतदारसंघातील जनतेवर खूप उपकार होतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − one =