You are currently viewing श्रीलंकेला ४१ धावांनी हरवत भारताने गाठली अंतिम फेरी

श्रीलंकेला ४१ धावांनी हरवत भारताने गाठली अंतिम फेरी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आशिया कपच्या सुपर-४ सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. प्रथम खेळताना भारतीय संघ २१३ धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचा संघही १७२ धावांवर बाद झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. यानंतर गिल १९ धावा करून बाद झाला आणि ही भागीदारी तुटली. रोहित शर्माने तुफानी शैलीत खेळत ४८ चेंडूत ५३ धावा केल्या आणि १० हजार एकदिवसीय धावाही पूर्ण केल्या. कोहली ३ धावा करून बाद झाला. इशान किशनने ३३ आणि केएल राहुलने ३९ धावा केल्या. खालच्या फळीकडून अक्षर पटेलने २६ धावा केल्या आणि टीम इंडिया २१३ धावांवर बाद झाली. श्रीलंकेसाठी वेलालगेने ४० धावांत एकूण ५ बळी घेतले. त्याच्याशिवाय चरित असलंकानेही ४ बळी घेतले. महिष तिक्ष्णालाही एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेची अवस्थाही बिकट होती. सलामीवीर निसांका ६ धावा करून आणि करुणारत्ने २ धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ कुसल मेंडिसही १५ धावांवर बाद झाला. यानंतर समरविक्रम १७ धावा आणि अस्लंका २२ धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. शनाकाला बाद करून रवींद्र जडेजाने श्रीलंकेला सहावा धक्का दिला. धनंजय डी सिल्वाने एक बाजू लावून धरली. त्याने वेलालगेसह अर्धशतकी भागीदारी करून संघाच्या विजयाच्या आशा उंचावल्या. जडेजाने डी सिल्वाला बाद करून ही भागीदारी भेदली. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १ बळी मिळाल्याने श्रीलंकेची धावसंख्या ९ गडी बाद १७२ अशी झाली. या धावसंख्येवर कुलदीपने आणखी एक विकेट घेत श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. कुलदीपने ४ बळी घेतले. बुमराहला २ बळी मिळाले.

श्रीलंकेसाठी ४० धावांत ५ बळी घेणार्‍या दुनिथ वेलालगेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारताचा सुपर-४ चा शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*माधवबाग आयोजित मोफत आरोग्य तपासणी*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*मोफत ! मोफत ! मोफत !*

 

*माधवबाग आयोजित आरोग्य तपासणी मोफत शिबिर*

 

*बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 वेळ स. 10 ते सायं 6.*

 

*हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड ,रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिर*

 

*तपासणी अंतर्गत*

*ECG-350/- मोफत*

*TMT – 200/- / Walk test मोफत(गरजेनुसार)*

* *रँडम ब्लड शुगर – 100/- मोफत*

*डॉक्टर कन्सल्टेशन 350/- मोफत*

*एकूण येणारा खर्च – 1000/- पूर्णपणे मोफत*

 

*सूचना – ज्या रुग्णांना वरील आजार किंवा त्या संबंधी लक्षणे असतील, अशाच रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल*

 

*अधिक माहितीसाठी संपर्क*

 

*कणकवली. 9373183888*

 

*कुडाळ 9011328581*

 

*सावंतवाडी : 7774028185*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − one =