चिरा/जांभा दगडास तात्पुरता स्वरूपात परवाने नाकारण्यात येत होते. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी काँग्रेसने पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात पुर्वी प्रमाणे परवाने देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व रत्नागिरी यांनी महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. या संदर्भात सिंधुदुर्ग व रत्नागिरी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला होता. महसूल व वनविभागाने आज 10/11/2020 रोजीच्या पत्राने चिरा/जांभा दगडाचे उत्खनन करण्याकरिता तात्पुरता परवाने पुर्वी प्रमाणेच स्थानिक व्यावसायिकांना चालू ठेवण्यास मान्यता दिली असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी सांगितले.

चिरा/जांभा दगडाच्या उत्खननास अल्प मुदतीसाठी परवाने पुर्वी प्रमाणे देण्याचा महसूल विभागाचा आदेश- इर्शाद शेख
- Post published:नोव्हेंबर 10, 2020
- Post category:बातम्या / वेंगुर्ले
- Post comments:0 Comments