You are currently viewing नील बांदेकर चार राज्यात प्रथम

नील बांदेकर चार राज्यात प्रथम

नील बांदेकर चार राज्यात प्रथम

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिव संस्कार तर्फे आंतरराज्यीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
हि स्पर्धा महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक व गुजरात या चार राज्यांमधील स्पर्धकांसाठी खुली होती.
या चारही राज्यातून आलेल्या असंख्य स्पर्धकांमध्ये बांदा येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या नील नितीन बांदेकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले.
आजपर्यंत नीलने अनेकविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपला आगळावेगळा असा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेला आहे. त्याच्या या यशात बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन समिती या सर्वांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा