You are currently viewing शांती दर्शन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आंबोली, चौकुळ, गेळेसाठी रुग्णवाहिका प्रदान

शांती दर्शन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आंबोली, चौकुळ, गेळेसाठी रुग्णवाहिका प्रदान

आंबोली

दिल्ली येथील डून स्कूल ओल्ड बॉईज सोसायटी आणि शांती दर्शन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने आंबोली, चौकुळ व गेळे या तीन गावांसाठी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. याचे लोकार्पण नुकतेच डाॅ.राजीव सिन्हा यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी भाऊ ओगले, सुनील नार्वेकर, बबन गावडे, बाळा कोरगावकर,सचिन नार्वेकर,उपसरपंच दत्तू नार्वेकर,दादा चिरेकर,ग्रामपंचायत सदस्य स्वप्नितां कर्पे,हेमंत नार्वेकर,पोलीस पाटील विद्या चव्हाण,सचिन नार्वेकर,अरुण चव्हाण,अर्जुन गावडे,वसंत गावडे,काशिराम दळवी,पोलीस दीपक शिंदे, आबा नार्वेकर,उत्तम पारधी,गजानन कर्पे,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

आंबोली, चौकुळ, गेळे येथील लोकांसाठी आणि येथील आरोग्य केंद्रातील रुग्णासाठी डून स्कूल ओल्डबॉयज सोसायटी, दिल्ली यांच्यामार्फत आंबोली येथील शांती दर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिन्हा यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिले आहे. येथील तिन्ही गावांना तसेच येथील आरोग्य केंद्रातील रुग्णांना त्याचा लाभ व्हावा यासाठी त्यांनी ही सेवा इथे सुरू केली आहे. या ठिकाणी येथील काही जणांचा एक गट करून त्यायोगे ड्रायव्हर आणि डिझेल यासाठी न्यूनत्तम रक्कम ठरवून ही सेवा देण्यात येईल. त्याचे नियोजन येथील जनता करणार आहे. तसेच गरिबांसाठी वेगळे निकष असतील, असे डॉक्टर सिन्हा यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =