You are currently viewing माजगाव – नालासह ग्रामीण भागात जनता कर्फ्यू”च्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद.

माजगाव – नालासह ग्रामीण भागात जनता कर्फ्यू”च्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद.

सावंतवाडी

कोरोनाची साखळी तोडण्यासह त्यावर मात करण्यासाठी गुरुवारपासून सावंतवाडी तालुक्यात लागू करण्यात करण्यात आलेल्या “जनता कर्फ्यू” ला ग्रामीण भागातही उस्फूर्त प्रतिसाद लाभला. पोलीस प्रशासनासह महसूल विभागाच्या अधिकारी वर्गाने ही ग्रामीण भागात फेरफटका मारून जनता कर्फ्यू च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील दवाखाने व मेडिकल वगळता सर्व बाजारपेठा व दुकाने बंद होती. जनतेनेही या जनता या कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनता कर्फ्यूची गरज ओळखून बहुतांश जनांनी घराबाहेर न पडता घरीच राहणे पसंत केले. या जनता कर्फ्यूचा काही जणांना फटका बसला मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूची नितांत गरज असल्याचे सांगून जोरदार समर्थन केले. जनता कर्फ्यूच्या कडक अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील रस्ते व बाजारपेठा दुपारनंतर अक्षरशः निर्मनुष्य व ओस पडले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा