You are currently viewing कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मजुरीवाढीच्या अंमलबजावणीसाठी निदर्शने

कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मजुरीवाढीच्या अंमलबजावणीसाठी निदर्शने

कामगार संघटना संयुक्त कृती समितीची मजुरीवाढीच्या अंमलबजावणीसाठी निदर्शने

इचलकरंजी : प्रतिनिधी

यंत्रमाग कामगारांची वाढलेली मजुरी , किमान वेतन देऊन कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी यासह विविध मागण्यांसाठी आज सोमवारी
कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने येथील
पाॅवरलूम असोसिएशन कार्यालय व सहाय्यक कामगार आयुक्त
कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यंञमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना शासनाच्या कोणत्याही मुलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने त्यांचे जगणे बेभरवशाचे झाले आहे.त्यातच
सहाय्यक कामगार आयुक्तांनी घोषणा केलेली कापडास प्रति मीटर
१० पैसे मजुरीवाढ देण्यास अद्याप यंञमाग कारखान्याचे
मालक तयार नाहीत.यामध्ये अनेक कारणे सांगून मजुरी देण्यास विरोध केला जात आहे.त्यामुळे यंञमाग कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी कामगार संघटना संयुक्त कृती समिती आता आक्रमक झाली असून कोणत्याही परिस्थितीत कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही ,असाच या समितीने निर्धार केला आहे.याच अनुषंगाने या समितीने आज सोमवारी येथील
पाॅवरलूम असोसिएशन कार्यालय व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.तसेच सहाय्यक कामगार आयुक्तांनी घोषित केलेली कापडाला प्रति मीटर १० पैसे मजुरीवाढीची अंमलबजावणी करावी , अशी मागणी केली.याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला.या निदर्शनामध्ये कामगार नेते भरमा कांबळे, शामराव कुलकर्णी, आनंदा गुरव, राजेंद्र निकम, सुनिल बारवाडे, शिवानंद पाटील, हणमंत लोहार, रियाज जमादार, प्रदिप साहू, रंगराव बोंद्रे, सुभाष कांबळे ,बंडा सातपुते, काशीनाथ शिकलगार ,सदाशिव यादव आदींसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =