You are currently viewing दाखले आपल्या घरी

दाखले आपल्या घरी

जिल्ह्यातील मळेवाड पहिली ग्रामपंचायत*

सावंतवाडी

सावंतवाडी — मळेवाड येथे प्रशासन आपल्या दारी अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जात तहसीलदार अरुण उंडे यांनी दाखल्यांचे वाटप केले.सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभियानांतर्गत असा उपक्रम करणारी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत ही पहिली ठरली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर प्रशासन आपल्या दारी अभियान सुरू केले आहे.याच अभियानाचा एक भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांनी सदर अभियानांतर्गत दाखला आपल्या दारी शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात शैक्षणिक प्रवेशावेळी लागणारे दाखले,आरोग्य योजनांसाठी लागणारे दाखले, त्याचबरोबर शासनाच्या इतर विविध योजनांसाठी लागणारे दाखले समाविष्ट करण्यात आले होते.या शिबिरात दाखल्यांसाठी लागणारे अर्ज दाखल करून त्यानुसार दाखले परिपूर्ण तयार झालेल्या दाखल्यांचे वितरण आज सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांनी मळेवाड गावात लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रायोगिक तत्त्वावर वाटप केले.दाखले वाटप कार्यक्रमाचे ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून नियोजन करण्यात आले होते.प्रशासन आपल्या दारी अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दाखल्यांचे वाटप करणारी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य शासनाच्या प्रशासन आपल्या दारी अभियानांतर्गत उपक्रम राबवणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.या उपक्रमाबद्दल सावंतवाडी तहसीलदार उंडे यांनी आपले मत व्यक्त करत असताना,ग्रामपंचायतीने राबवलेल्या या अभियानाच्या उपक्रमासंदर्भात कौतुक करत ग्रामपंचायतचे अभिनंदन केले.जनतेला शासकीय योजना साठी लागणारेविविध दाखले व कागदपत्र एकाच ठिकाणी मिळावी यासाठी राज्य सरकारनेप्रशासन आपल्या दारीहे अभियान सुरू केले आहे याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आव्हान तहसीलदार उंडे यांनी केले.
या दाखला वाटपकार्यक्रमा वेळी सरपंच सौ मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,मधुकर जाधव बाबल नाईक,बापू नाईक,सुरेश नाईक,हर्षा नाईक,विश्रांती नाईक, अनुष्का नाईक,प्रियंका पार्सेकर,लवू सातार्डेकर,चंद्रकांत नाईक,प्रवीण नाईक,नंदा नाईक,चिन्मयी नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा