You are currently viewing राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु – उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु – उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील महाविद्यालयांना सुरु करण्याचा मुहूर्त अखेर मिळाला आहे.

येत्या २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार असल्याची घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आह. महाविद्यालये सुरु करताना शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचे १०० टक्के लसीकरण सक्तीचे असेल.

त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने वसतिगृहे सुरु करण्याबाबत विद्यापीठांना सूचित करण्यात आले आहे. दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नियम पाळावेत असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा