सावंतवाडी
मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंबोली चेक पोस्टवर धडक देत कर्नाटक पासिंग च्या गाड्यांचा रात्रीस खेळ चाले प्रकार उघडकीस आणून कारवाई करण्यास भाग पडले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता यांनी पत्रक काढून सिंधुदुर्गातून आंबोली घाट मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करण्या संदर्भात पत्रक काढावे लागले हे मनसेचे यश असल्याचे माहिती मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी म्हटले आहे
यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने आंबोली घाट मार्ग हा अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन देखील या घाटमार्गावरून ओव्हरलोड वाहतूक करणारे ट्रक दैनंदिन घाट मार्गे जात असल्याच्या तक्रारी व्यापारी व स्थानिक रहिवाशांकडून मनसेकडे तक्रारी आल्या होत्या.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी 19 मे रोजी रात्री कर्नाटक पासिंग च्या गाड्या अवजड वाहतूक करत असताना आंबोली चेक पोस्टवर धडक दिली होती.यानंतर अवजड वाहने म्हणजेच मल्टी एक्सल गाड्यांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार,निवेदने देऊन लक्ष वेधले होते.
त्यानुसार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी पत्रक काढून आंबोली मार्गे घाटमाथ्यावर होत असलेली अवजड वाहनांची वाहतूक बंद करणे संदर्भात निर्देश दिले आहेत. या पत्रकात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांनी असे म्हटले आहे की मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दिनांक २७ एप्रिल २३ पत्रान्वये दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीसाठी पूर्वीप्रमाणे सुरू करत असल्याचे कळविण्यात आले आहे त्यामुळे आंबोली घाटाची वस्तुस्थिती पहाता आंबोली घाट मार्गे वळवण्यात आलेले अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करत असल्याचे मनसेच्या माजी शहर अध्यक्ष तथा मनसे विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी म्हटले आहे.