You are currently viewing कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे बिगुल वाजले…

कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे बिगुल वाजले…

काही वेळात निघणार आरक्षण सोडत

दोडामार्ग
कोरोनानं थांबलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज निवडणूकीसाठी आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे शहरवासीय आणि निवडणूक रिंगणात उतरू पाहणाऱ्या अनेकांचे राजकीय भवितव्य आजच्या आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी आज दोडामार्ग येथील महाराजा हॉल मध्ये पीठासीन अधिकारी तथा प्रांत अधिकारी सुशांत खांडेकर यांच्या प्रमूख उपस्थितीत आरक्षण सोडत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =