You are currently viewing मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर कॅरम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर कॅरम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

सावंतवाडी

माणगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीची कु.साक्षी रामदुरकर हीने प्रथम क्रमांक पटकावला.अकरा वर्षीय साक्षीने सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौदा वर्षांखालील गटात जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व ठेवले.मागील पंचवीस वर्षे अनेक राज्य आणि राष्ट्रीयस्तरीय कॅरम खेळाडू तयार करणारे जिल्ह्यातील ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे उल्लेखनीय यश मिळवले.

राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी कु.साक्षीचे कौतुक करतानाच कै.सुर्यकांत पेडणेकर यांच्या कार्याची दखल घेतली.सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे सर्वेसर्वा संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर यांनी गेली तीस वर्षे जिल्हास्तरापासुन राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कार्यामुळे आज जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रगती करत आहेत.त्यांच्या मागुन त्यांचे चिरंजीव व मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी देखील हे कार्य पुढे सुरु ठेवल्याचे सांगत राणीसाहेबांनी त्यांचे कौतुक केले.मागील आठ वर्षांत मुक्ताई ॲकेडमीच्या माध्यमातुन पहिल्यांदाच जिल्ह्यातील दोन मुली राष्ट्रीय स्तरावर आणि नऊ मुले व मुली राज्य स्तरावर खेळले.
कु.साक्षीला पुढे होणा-या विभाग स्तरावरील स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी राणीसाहेब शुभदादेवी भोंसले,क्रीडा शिक्षक श्री.नारायण केसरकर,श्री.कौस्तुभ पेडणेकर,साक्षीचे आई,वडील,खेळाडू उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 7 =