You are currently viewing मनसेचे शहर सचिव कौस्तुभ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालयात कपडे, धान्य, खाऊ वाटप

मनसेचे शहर सचिव कौस्तुभ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालयात कपडे, धान्य, खाऊ वाटप

सावंतवाडी :

 

आरोस – कोंडुरा येथील श्री माऊली मूकबधिर विद्या मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी शहर सचिव कौस्तुभ नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

मूकबधिर विद्या मंदिरातील मुलांना नाईक यांच्याकडून कपडे तसेच धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नंदू परब, दर्शन सावंत, हेमंत नाईक, ओमकार सावंत तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − nine =